Ramesh Mhatre Dombivli Doctor Assault: रमेश म्हात्रेंचा शेवटी डॉक्टरांकडेच धावा... अटक झाल्यावर 'अस्वस्थ', गाठलं रूग्णालय

Ramesh Mhatre Dombivli Doctor Assault
Ramesh Mhatre Dombivli Doctor Assaultpudhari
Published on
Updated on

Ramesh Mhatre Dombivli Doctor Assault: डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रूग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली. मात्र अटकेनंतर लगेच रमेश म्हात्रे यांची प्रकृती बिघडली अन् डॉक्टरांवर हात उचलणाऱ्या म्हात्रेंना डॉक्टरांकडेच धावत जावं लागलं. त्यांना ठाण्याच्या सिव्हिल रूग्णालयात अती दक्षता विभागात ठेवलं आहे.

Ramesh Mhatre Dombivli Doctor Assault
Ramesh Mhatre Arrest : शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरण; शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश म्हात्रे यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळं उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित डॉक्टर म्हात्रे यांच्याबाबत वैद्यकीय अहवाल देतील. त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच पोलीस पुढची कायदेशीर कारवाई करणार आहेत.

दरम्यन, शास्त्रीनगर रूग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणी रोहित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी शास्त्रीनगर रूग्णालयात भेट देऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. तसेच शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील घडला प्रकार दुर्दैवी असून म्हात्रेंवर कारवाई करण्यात येईल असे सुतोवाच दिले होते.

Ramesh Mhatre Dombivli Doctor Assault
Dombivli Assault on Doctors: कारवाई होणार! श्रीकांत शिंदे डॉक्टरांच्या बाजूने; शास्त्रीनगर रूग्णालय मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

यानंतर पोलिसांनी या मारहाण प्रकरणातील इतर कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर आता मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांना देखील पोलिसांनी अटक केली. मात्र अटकेची माहिती समोर येताच रमेश म्हात्रे यांची प्रकृती अचानक अस्वस्थ झाली. त्यांना ठाणे सिव्हिल रूग्णालयात हलवण्यात आलं. यामुळं या त्यांच्या अस्वस्थतेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Ramesh Mhatre Dombivli Doctor Assault
Shrirampur Hospital Death: प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचे रुग्णालयात आंदोलन

म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्यात येणार असं सांगत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शास्त्रीनगर रूग्णालयातील डॉक्टरांना पाठिंबा दिला होता. त्यांनी मी स्वतः डॉक्टर असल्यानं मला डॉक्टर कोणत्या परिस्थितीत काम करतात याची जाणीव असल्याचं सांगितलं होतं. आता म्हात्रे यांना अटक होत आहे. तसेच आता पक्ष म्हणून एकनाथ शिंदे रमेश म्हात्रेंवर काय आणि कधी कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news