Ramdas Kadam: अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा; रामदास कदम यांची मागणी

तटकरेंच्या भूमिकेबाबत कदमांनी व्यक्त केला संशय; आरोप फेटाळत कायदेशीर नोटीस पाठवण्याचा तटकरेंचा इशारा
Ramdas Kadam
Ramdas Kadam Pudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घातपातामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा हात असल्याचा संशय शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी तटकरेंची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सध्या रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यात वाद पेटला आहे. या वादातून कदम यांनी तटकरे यांच्यावर सोमवारी गंभीर आरोप केले.

Ramdas Kadam
Central Railway Train Delays: मध्य रेल्वेवर साखळी खेचण्याच्या सात घटना; लोकलसह मेल-एक्स्प्रेस गाड्यांना विलंब

हे मी पहिल्यांदा ऐकतोय की, त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचे होते, तर मग अजित पवार यांच्या घातपातमध्ये त्यांचाही हात आहे की काय, असा संशय निर्माण होतो. त्या दृष्टीने देखील तटकरेंची चौकशी झाली पाहिजे. तटकरे यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा असल्याने ते काहीही करू शकतात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

निवडणुकीत माझ्या पाठीला जखम असताना मी खेड, दापोली, मंडणगड, गुहागर या चार तालुक्यांमध्ये खांद्याला खांदा लावून काम केले. विधानसभा निवडणुकीच्यावेळी माझ्या मुलाच्या विरोधात त्यांनी काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेची महायुती असताना त्यांनी गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांना मदत केली, अशी टीका कदम यांनी केली.

Ramdas Kadam
Mumbai Firecracker shop fire: मालवणीत फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग; १६ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू

अजित पवार आणि तुमच्यावर ज्या कोकणातील १६ धरणांचे ७० हजार कोटींचे आरोप होते, त्यातील हे कोयना धरण होते. गेले अनेक वर्षे जे काम बंद पडले आहे. तसेच २५ वर्षांपासून माझ्या १४ गावचे लोकं पाण्यापासून वंचित राहिले. तटकरे हे तुमचं पाप होतं, असा आरोप करत कदम यांनी मला बोलायला लावू नको, असा इशारा दिला.

आरोपांना तटकरे देणार उत्तर

सुनील तटकरे यांनी रामदास कदम यांचे आरोप फेटाळून लावले असून त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्‍यांना नोटीस पाठवण्‍यात येणार असल्‍याचे तटकरे म्‍हणाले.

कदम यांचे आरोप बेजबाबदारपणाचे; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केलेले आरोप बेजबाबदारपणाचे आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.

कदम यांच्याकडे या प्रकरणाबाबत ठोस पुरावे असतील तरच त्यांनी अशा संवेदनशील विषयावर बोलले पाहिजे. कोकण परिसरातील जुना राजकीय संघर्ष आणि राष्ट्रवादीचा विस्तार यामुळेच हे निराधार आरोप केले जात असावेत, असे पाटील म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.