Lok sabha election 2024 : राज ठाकरेंनी मोदींसमोर मांडल्या ‘या’ सात अपेक्षा

राज ठाकरे (संग्रहित छायाचित्र)
राज ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असून त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत, असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत पंतप्रधान मोदींसमोर सात अपेक्षा व्यक्त केल्या. Lok sabha election 2024

राज म्हणाले, ते सत्तेत येणार नाहीत त्यांच्यावर बोलण्यात का वेळ वाया घालवता देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्र शिंदे या सर्वांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवान यांच्यावर बोलून वेळ घालवला. गेल्या पाचच वर्षात काश्मीरमधून ३७० कलम हटविले अयोध्येत राम मंदिर उभारले, तीन तलाकच विषय मिटवून मुस्लिम महिलांना दिलासा देण- ारा कायदा केला, यासारखे धाडसी निर्णय केवळ मोदी पंतप्रधान होते म्हणूनच झाले, असे गौरवोद्वार राज यांनी काढले.

Lok sabha election 2024 : राज ठाकरे यांच्या सात अपेक्षा

१) मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय गेली अनेक वर्षे खितपत पडला असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर तात्काळ हा निर्णय घ्यावा.

२) अरबी समुद्रात शिवछत्रपतींचा पुतळा उभा राहील की नाही माहित नाही पण त्यांचे खरे स्मारक असलेल्यांना शिवकालीन वैभव प्राप्त करून देण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावरील समिती नेमावी.

३) हिंदुस्थानभर पराक्रम गाजवणाऱ्या मराठ्यांचा इतिहास देशातील विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमात शिकवावा.

४) मुंबई गोवा महामार्ग अजूनही खड्ड्यानी व्यापला आहे. गेली अनेक वर्षे तो पूर्ण झालेला नाही तो तात्काळ पूर्ण व्हावा.

५) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला धक्का लावणार नाही हे जाहीरपणे ठणकावून सांगा.

६) काही मूठभर मुसलमान आहेत ज्यांना गेल्या दहा वर्षांत डोकं वर काढता आले नाही. तेच लोक आज काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यायला निघाले आहेत. ओवेसीसारख्याच्या पाठीशी हेच मूठभर मुसलमान आहेत. या मूठभर मुस्लिमांचे अड्डे झालेत. त्या देशद्रोहींच्या अड्डयात लोक घुसवा आणि देश कायमचा सुरक्षित करा.

७) मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेसाठी जास्तीत जास्त निधी द्या.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news