Raj Thackeray : भाजपने जे पेरलं तेच उगवलं राज ठाकरेंची टीका!

मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडली. देशातील अनेक घटनांवर केले परखड भाष्य..
भाजपने जे पेरल तेच उगवलं राज ठाकरेंची टीका!
भाजपने जे पेरल तेच उगवलं राज ठाकरेंची टीका!file photo
Published on
Updated on

Raj Thackeray criticizes the BJP

पुढारी ऑनलाईन : १२ वषापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या ट्रोल टीमने विरोधकांवर बोचरी टीका सुरू केली. त्‍यांनी १२ वर्षापूर्वी जे पेरलं होतं ते आता उगवल आहे. आता हेच ट्रोलिंग भाजपवर होत आहे. पंतप्रधानांवर झालेली टीका ही चुकीची आहे. पण विरोधकांवर होणारे टीका ट्रोलिंगही बंद व्हाव्यात. तुम्हीही मर्यादा पाळल्या पाहिजेत असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केल. मनसेच्या विद्यार्थी संघटनेचा 20वा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्‍यावेळी ते बोलत होते.

भाजपने जे पेरल तेच उगवलं राज ठाकरेंची टीका!
Ravi Kishan : ‘एवढी गरीबी की 7 स्टार हॉटेलमध्ये खिचडी खातो’, लोक म्हणाले- ‘अशी गरिबी सगळ्यांना मिळो’

जंतर-मंतरवर जे विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. त्‍यांच्यावर लाठीमार करण्यात आला होता. त्‍यांना आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार असा प्रश्न त्‍यांनी उपस्थित केला. नीट पेपर फुटी हे कारण होत. मात्र यात फक्त विद्यार्थीच नव्हते तर तरूणही होते आणि सभोवतालल्या नैराश्याच्या वातावरणातून हे सर्व झाल्याची टीका त्‍यांनी केली.

मोदी म्हणाले ज्यांनी ट्रोल केले मी त्‍या सगळ्यांना माफ करतो. नीटचे पेपर फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी जीवन संपवले त्‍यांच्या आई-वडीलांची कोण माफी मागणार म्हणत त्‍यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

भाजपने जे पेरल तेच उगवलं राज ठाकरेंची टीका!
The Glass House : ना भिंती, ना खिडक्या! जंगलाच्या कुशीत अभय देओलचं काचेचं घर, VIDEO पाहून व्हाल थक्क!

जिथे आपण श्रद्धेने जातो. त्‍या मंदिरात आपण दान करतो. त्‍या मंदिरात लाखो, कोट्यवधी रूपये जमा होतात. त्‍याचे काय होते ते काही कळत नाही. म्हणत त्‍यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी चोरीच्या प्रकरणाचाही आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

आजच्या देशातील सर्व नकारात्‍मक व्यवस्थेला कंटाळलेला तरूण आशेने, श्रद्धेने मंदिराचा रस्ता पकडतो. त्‍याला धर्माध बनवू नका. फक्त रामाचे नाव घेउन काही होणार नाही तर तरूणांसाठी दर्जेदार शिक्षण आणि पारदर्शक् व्यवस्था, नोकरी यांची गरज असल्याचे त्‍यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news