Mumbai March: CJPच्या आंदोलनाला ठाकरे बंधूंचा पाठिंबा; ४ ऑक्टोबरला मुंबईत भव्य मोर्चा, वेळ आणि ठिकाण काय? राज ठाकरेंनी सांगितलं...

Thackeray Brothers Mumbai March: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भायखळा ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
Thackeray Brothers Mumbai March
Thackeray Brothers Mumbai MarchPudhari
Published on: 
Updated on: 

Thackeray Brothers Mumbai March: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हा मोर्चा भायखळा ते आझाद मैदान असा काढण्यात येणार असून, सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात होणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.

हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या मोर्चामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा वापरला जाणार नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Thackeray Brothers Mumbai March
Gold Price Today: सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण! 1.50 लाखांवर आला 24 कॅरेटचा भाव; कुठे मिळतंय स्वस्त सोनं?

‘सीजेपी’च्या आंदोलनाला ठाकरे बंधूंचा पाठिंबा

याचवेळी उद्धव ठाकरे यांनी ‘सीजेपी’कडून २ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली असो किंवा नसो, लोकशाही वाचवण्यासाठी जो कोणी रस्त्यावर उतरेल, त्याच्या पाठीशी आपण उभे राहू, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

Thackeray Brothers Mumbai March
Neeru Dhanda Wins Gold: आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरू धांडाने रचला इतिहास; ट्रॅप शूटिंगमध्ये भारताला सुवर्णपदक

मतदारांच्या मताचा आदर राखण्यासाठी लढा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एकत्रितपणे चर्चा केली. लोकशाही व्यवस्थेत मतदारांच्या मताला महत्त्व आहे. त्यामुळे मतदारांच्या मताचा आदर राखण्यासाठी आणि लोकशाहीवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी हा लढा असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले.

४ ऑक्टोबरच्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या मोर्चामुळे मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

मोर्चाचा मार्ग आणि वेळ

मोर्चाची तारीख: ४ ऑक्टोबर २०२६
सुरुवातीची वेळ: सकाळी १० वाजता
मोर्चाचा मार्ग: भायखळा ते आझाद मैदान, मुंबई
मुख्य मुद्दा: निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात आंदोलन
महत्त्वाचं: मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news