

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई शहरासह उपनगरांत पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट दिल्याने सोमवारी (दि.21 जुलै) जोराच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतो आहे. मुंबईच्या उपनगरात सकाळी 8 वाजेपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने मुंबईचा वेस्टर्न एक्सप्रेस हायव्हेकवर मोठा परिणाम होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी पावसाचा आढावा घेतला असून पाऊस खबरबातसाठी बघत रहा...
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार
बांद्रा, अंधेरी, मालाड,बोरिवली मध्ये जोरदार पाऊस
रविवार (दि.20) रात्रीपासूनच पश्चिम उपनगरात पावसाची संततधार सुरू
सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबह
अंधेरी सबवेला ही पाणी साचायला सुरवात झाल्याने नागरिकांना सर्तकतेचा इशारा
पश्चिम उपनगरात देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली असून अंधेरी, विलेपार्ले भागालाही पावसाने झोडपले आहे.
जुलै महिन्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव आणि धरणे बऱ्यापैकी भरतात. मात्र, यावेळी काही ठिकाणी पडलेल्या तुरळक सरी वगळता गेला आठवडा कोरडा गेला. तथापि, सोमवारपासून (दि.21) पुढील चार दिवस ३० ते ४० तास प्रतितास वेगाने वारे वाहतील. तसेच गडगडाटासह पावसाच्या जोराच्या सरी बरसतील, असा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे.
बुधवार आणि गुरुवारी पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामानाची बदललेली स्थिती पाहता कमाल तापमानात घट झाली. सांताक्रूझ वेधशाळेमध्ये शनिवारच्या (२७/३३ अंश सेल्सिअस) तुलनेत रविवारी (२६/३० अंश सेल्सिअस) कमाल तापमान थेट ३ अंशांनी घसरले.
सोमवारपासून (दि,21 जुलै २५/३१ अंश सेलसिअस ) त्यात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाची उघडीप असल्याने उकाड्यात वाढ कायम असून सांताक्रूझ वेधशाळेमध्ये रविवारी ८६ टक्के आर्द्रतेची नोंद झाली. शनिवारी हे प्रमाण ८२ टक्के इतके होते.