Rahul Narwekar : संजय राऊतांवर अब्रूनुकसानीचा दावा करणार; जमीन खरेदीच्या आरोपांवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची स्पष्टोक्ती

Rahul Narwekar defamation suit Sanjay Raut : विरोधात निर्णय दिल्‍याने बदनामी करण्याचा गलिच्छ प्रकार
Rahul Narwekar defamation suit Sanjay Raut
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्‍या आरोपांवर विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकरांनी प्रत्‍युत्तर दिले आहे. Pudhari News
Published on: 
Updated on: 

Rahul Narwekar defamation suit Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांत तथ्य नाही. विरोधात निर्णय दिला म्हणून नाराज असल्याने ते खोटे आरोप करत आहेत आणि जुने हिशोब संपवण्याचे प्रयत्न करत आहेत. आता आम्ही त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणार आहोत, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

संजय राऊत यांनी कोणते आरोप केले?

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात राहुल नार्वेकर आणि त्यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनी मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली आहे. त्यांनी कातकरी आदिवासी कुटुंबांच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील १५ एकर जमिनीवरून कातकरी आदिवासी कुटुंबांची घरे पाडून त्यांना विस्थापित केल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर पोस्ट शेअर केली आहे.

बेछूट आरोपांचे आता त्यांना उत्तर द्यावे लागणार

आज माध्‍यमांशी बोलताना राहुल नार्वेकर म्‍हणाले की, "या प्रकरणी मी माहिती घेतली; त्यात २०२४ सालाचे मालक होते आणि त्यानंतर तक्रार झाली होती. मानवी हक्क आयोगाकडे तक्रार गेली. प्रशासनाने यासंदर्भात चौकशी केली होती आणि अहवाल पाठवला होता. तक्रारीचा आणि माझा संबंध नसल्याचं त्याच वेळी स्पष्ट झालं आहे. संजय राऊत यांना परिणाम भोगावे लागत नसल्याने ते नेहमी बेछूट आरोप करत असतात. मात्र, आता त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे."

Rahul Narwekar defamation suit Sanjay Raut
Rahul Narwekar | एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही! धुळ्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ग्वाही

बदनामी करण्याचा गलिच्छ प्रकार

आदिवासी बांधवांना पर्यायी घरं उपलब्ध झाली आहेत. त्‍यांची माझ्या आणि माझ्‍या कुटुंबाविरोधात तक्रार नाही. बदनामी करण्याचा गलिच्छ प्रकार राऊत करत असल्याचेही नार्वेकर म्हणाले. संजय राऊत यांनी जागा लुटण्याचा प्रयत्न केला आहे. भांडुपच्या जागेसंदर्भात सगळ्यांनाच माहिती आहे. मला खालच्या पातळीवर जात स्वतःची किंमत कमी करायची नाही आहे. योग्य ती कायदेशीर कारवाई मी करेन, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

Rahul Narwekar defamation suit Sanjay Raut
Rahul Narwekar: 'नया है यह', 'काय रे ही तुझी भाषा'... मराठी कलाकारांनी घेतली राहुल नार्वेकरांची शाळा; कोण काय म्हणालं?

काहींना फक्त भोंगा वाजवायचा असतो

संजय राऊत आरोप करत असलेल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील जमिनीसंदर्भात २०२५ चा तहसीलदारांचा अहवाल वाचा. आदिवासी बांधवांनी प्रतिज्ञापत्र दिलं आहे. मला हे माहिती नव्हतं, आम्ही जागा घेण्याआधीचे हे सगळे वाद होते. ही जमीन भोगवटा क्रमांक १ ची आहे. आदिवासी जमीन असती, तर ट्रान्सफरच झाली नसती. काहींना फक्त भोंगा वाजवायचा असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.