

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील घोषणा आज (दि.२७) केली. आता आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (X) अकाउंटवरून दिली आहे. फडणवीस यांनी म्हटले आहे की, शेतकर्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे मिळालेच पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न होत असतात.
सत्यप्रत बियाण्यांच्या (ट्रुथफुल सिड्स) उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतच्या संनियंत्रणासाठी साथी पोर्टलची राज्यात अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना इथून पुढे राज्यात खरीप हंगाम 2025 पासून राज्यात सत्यप्रत बियाणांची विक्री, वितरण हे साथी (Seed Authentication Traceability and Holistic Inventory ‘SATHI’) पोर्टलद्वारे करावे लागणार आहे.
राज्य सरकारच्या सरकारसाठीच्या या निर्णयामुळे आता शेतकर्यांना प्रमाणित आणि खात्रीशीर बियाणे उपलब्ध होईल. परराज्यात उत्पादित मात्र, राज्यात विक्री होणार्या बियाण्यांवर यामुळे नियंत्रण ठेवणे शक्य होईल. या निर्णयाचा निश्चितपणे आमच्या शेतकरी बांधवांना लाभ होई, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.