Mumbai to Sindhudurg Road: गणपतीला सिंधुदुर्गात जाताय? मुंबई- गोवाऐवजी हे आहेत सहा पर्यायी मार्ग

Alternate Route from Mumbai to Goa: चाकरमान्यांसाठी लांजा, राजापूर तालुक्यासाठीही प्रवास सोयीचा
Mumbai to Sindhudurg Road
Mumbai to Sindhudurg RoadPudhari
Published on
Updated on

Alternate Route from Mumbai to Goa Pune Bangalore Highway News

मुंबई : राजेश सावंत

शनिवार 23 ऑगस्टपासून हजारो चाकरमानी गणपतीसाठी कोकणात जाणार असल्यामुळे मुंबई गोवा हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार्‍या चाकरमान्यांनो व्हाया पुणे-बेंगलोर महामार्गाने कोल्हापूर, राधानगरी, निपाणी मार्गे प्रवास करा. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा व राजापूर तालुक्यात जाणार्‍या चाकरमान्यांसाठीही हा रस्ता सोयीचा असून त्यांना कराड, मलकापूर मार्गे कोकणात जाता येणार आहे. यामुळे वेळेची मोठी बचत फोन त्रास कमी होणार आहे.

गणपतीसाठी मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यातून लाखो चाकरमानी कोकणातील आपल्या गावी जाणार आहेत. 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी असल्यामुळे शनिवार 23 ऑगस्ट पासून 26 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात एसटी बससह खाजगी बस, खाजगी वाहने हजारोच्या संख्येने कोकणच्या दिशेने निघणार आहेत.

Mumbai to Sindhudurg Road
Ganesh Chaturthi | बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी

सर्व एसटी व खाजगी बस मुंबई गोवा महामार्गाने जाणार आहे. त्यात काही खाजगी वाहनेही याच मार्गाचा वापर करणार आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन, 10 ते 11 तासाचा प्रवास 15 ते 20 तासावर जाण्याची शक्यता आहे. त्यात वडखळ ते माणगावपर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे असल्यामुळे हे खड्डे चुकवताना वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हा प्रवास चाकरमान्यांना नकोसा होऊ शकतो. त्यामुळे व्हाया मुंबई पुणे एक्सप्रेस वे मार्गे पुणे व पुढे बेंगलोर महामार्ग पकडल्यास कोकणाचा प्रवास जलद व आरामदायी होऊ शकतो.

एसटी बस व खाजगी बसला व्हाया पुणे जाणे शक्य नसल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, मालवण, कुडाळ, कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील चाकरमान्यांसाठी आपल्या स्वतःच्या गाडीने पुणे मार्गे सातारा, कराड, कोल्हापूर, निपाणी मार्ग सोयीचा ठरणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात येणार्‍या लांजा व राजापूर तालुक्यातील गावांमध्ये जाण्यासाठीही कराड मलकापूर आंबा व अनुस्कुरा घाटही सोयीचा आहे. यामुळे केवळ मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा त्रास टळणार नाही तर वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे. एवढेच काहीतरी इंधनाचीही बचत होणार आहे.

Mumbai to Sindhudurg Road
Mumbai Atal Setu toll news: अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून टोलमाफी, अंमलबजावणी सुरू

पुणे मार्गे कोकणात जाण्यासाठी 6 पर्याय

  • आंबा घाट

    कराड येथून पाच किलोमीटरवर उजव्या बाजूला वळण घेऊन मलकापूर, आंबा घाट मार्गे पाली व पुढे मुंबई- गोवा महामार्ग जाता येते.

  • अणुस्कुरा घाट

    कराड येथून पाच किलोमीटरवर उजव्या बाजूला वळण घेऊन मलकापूर, अणुुस्कुरा घाट पाचल व पुढे मुंबई गोवा महामार्ग येथे जाता येते.

  • करूळ घाट

    कराड कोल्हापूर शहर, रंकाळा, गगनबावडा करूळ घाट वैभववाडी मार्गे मुंबई गोवा हायवे जाता येते.

  • भुईबावडा घाट

    कराड कोल्हापूर शहर, रंकाळा, गगनबावडा, भुईबावडा घाट, भुईबावडा, उंबर्डे, खारेपाटण मार्गे मुंबई गोवा हायवे जाता येते.

  • फोंडा घाट

    कराड कोल्हापूर शहर, रंकाळा, राधानगरी, फोंडा घाट मार्गे फोंडा पुढे कणकवली गोवा महामार्गाला जाता येते.

  • आंबोली घाट

    पुणे-बंगळुरु हायवे निपाणी येथे उजवे वळण घेऊन, आजरा, आंबोली, आंबोली घाट, माणगाव सावंतवाडी जाता येते. यामागे दाणोली, विलवडे, बांदा येथेही जाता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news