

Pudhari News Predict Poll 2026 BMC Election
मुंबई : मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. शुक्रवारी मतमोजणी होणार असून मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ‘पुढारी न्यूज’च्या प्रेडिक्ट पोलमधून मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मराठी पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी ‘एआय’चा वापर करण्यात आला आहे.
‘पुढारी न्यूज’च्या टीमने दिलेला प्रॉम्प्ट काय?
पुढारी न्यूजच्या टीमने एआय टूल्सवर ‘सध्या सुरू असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी प्रत्येक राजकीय पक्षानुसार जिंकणाऱ्या जांगांचा अंदाज सांगा. यात पुढील गोष्टी लक्षात ठेवा.
1. 2017 च्या महापालिका निवडणुकीच्या आधार घेऊ नका.
2. 2024 च्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा आधार घेऊ नका.
3. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष युती करुन लढत आहेत, हे लक्षात घ्या.
4. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही एकत्र लढत आहेत हे लक्षात घ्या.
5. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरेंसोबत आहे.
6. अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहे.
7. या विश्लेषणासाठी ऑनलाईन वृत्तपत्रे, व्हिडिओ, फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियावरील माहिती मते, विश्लेषण, टीव्हीवरील चर्चा आणि अन्य माहिती स्रोतांचा आधार घ्या. कोणताही पक्षपात, प्राधान्य किंवा पूर्वग्रह या विश्लेषणात ठेवू नका.
कोणत्या एआय इंजिनचा वापर?
चॅट जीपीटी, गुगल जेमिनी, ग्रोक, मेटा एआय, डीपसीक, परप्लेक्सिटी या एआय इंजिनवर पुढारी न्यूजच्या टीमने प्रॉम्प्ट दिले होते.
(एआय इंजिनला ग्राऊंड रिएलिटी माहिती नसते. मतदारांची लाट एआयला माहिती नसते. एआय इंजिन्सला उपलब्ध असलेल्या डेटाच्या आधारे हा अंदाज वर्तवण्यात आला, याची वाचकांनी नोंद घ्यावी)
मुंबई महापालिकेबाबत ‘एआय’चा अंदाज?
एकूण जागा 227
भाजपा : 90-100
शिवसेना (एकनाथ शिंदे) : 35- 45
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : 55-65
मनसे : 05- 10
काँग्रेस : 10- 20
इतर : 15- 20
निवडणुकीतील 10 प्रश्नांबाबत मुंबईकरांच्या मनातली उत्तरं समोर
1. मुंबई वेगळी होणार/ गुजरातला जोडणार अशा मुद्द्यांचा तुमच्या मतदानावेळी विचार तुम्ही केला का?
हो - 59%
नाही - 41%
2. मराठी-हिंदू महापौर- मुस्लीम महापौर अशा मुद्द्यांचा तुमच्या मतदानावेळी विचार तुम्ही केला का?
हो - 58%
नाही - 42%
3. मुंबईतील गेल्या काही वर्षातील पायाभूत सुविधांचे श्रेय तुम्ही कुणाला द्याल?
देवेंद्र फडणवीस - 53%
उद्धव ठाकरे - 47%
4. उद्धव आणि राज यांची युतीनं तुमच्या मतदानाच्या निर्णयावर प्रभाव टाकला का?
हो- 63%
नाही- 37%
5. अदानी या उद्योगपतींकडे मुंबईतील अनेक उद्योग जातायत, या ठाकरे बंधूंच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण तुम्हाला पटले का?
अ. गांभीर्याने पाहतो, मात्र कौल ठाकरेंना नाही - 31%
ब. गांभीर्याने पाहतो, कौल ठाकरेंकडे - 40%
क. हा मुद्दा महत्त्वाचा नाही, तरीही कौल ठाकरेंकडे - 7%
ड. हा मुद्दा महत्त्वाचा नाही, कौल भाजपकडे - 22%
6. ठाकरे युती आणि महायुती यांच्यातील कोणत्या पक्षाचा जाहीरनामा तुम्हाला आवडला?
अ) ठाकरेंचा - 30%
ब) महायुतीचा - 28%
क) कुणाचाच नाही - 18%
ड) दोन्ही पाहिलेले नाहीत - 24%
7. मुंबईत गुजराती, उत्तर भारतीय यांची संख्या तुम्हाला चिंतेची बाब वाटते का? याआधारे तुम्ही मतदानाचा निर्णय घेणार का?
अ) चिंतेची बाब वाटते, त्यानुसार मतदान करणार - 43%
ब) चिंतेची बाब वाटते, मात्र मतदानावर परिणाम नाही - 29%
क) चिंतेची बाब वाटत नाही - 28%
8. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यात आपण कुणाला प्राधान्य द्याल?
अ) ठाकरेंची शिवसेना - 42%
ब) शिंदेंची शिवसेना - 27%
क) दोघांनाही - 09%
ड) दोघांनाही नाही - 22%
9. मुंबईतील न सुटलेल्या नागरी समस्यांना तुम्ही कुणाला जबाबदार मानता?
अ) उद्धव ठाकरे - 33%
ब) देवेंद्र फडणवीस - 24%
क) पूर्वीचे काँग्रेस शासन - 27%
ड) सांगता येत नाही - 16%
10. भाषिक अस्मिता आणि विकास यात आपण काय निवडाल?
अ) दोन्ही - 25
ब) भाषिक अस्मिता - 41
क) विकास - 23
ड) हा निर्णय अधिक गुंतागुंतीचा आहे - 11