Pravin Darekar: भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या संचालकपदी भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर बिनविरोध

मुंबईतील सर्वसामान्य जनतेला स्वस्तात मोठे घर तेही बिल्डरशिवाय मिळावे म्हणून त्यांनी आणलेली स्वयं पुनर्विकास योजना राज्य शासनाने स्वीकारली आहे.
Pravin Darekar
Pravin DarekarPudhari
Published on
Updated on

मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष व भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांची भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आमदार प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेचे अध्यक्ष असून महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदांची धुरा देखील ते सांभाळत आहेत.

सहकार क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करताना प्रवीण दरेकर यांनी सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला थेट लाभ होईल अशा नवनवीन योजना सहकारात आणल्या. मुंबईतील सर्वसामान्य जनतेला स्वस्तात मोठे घर तेही बिल्डरशिवाय मिळावे म्हणून त्यांनी आणलेली स्वयं पुनर्विकास योजना राज्य शासनाने स्वीकारली आहे.

Pravin Darekar
Thane Palghar District Bank Results: ठाणे जिल्हा बँकेवर प्रथमच महायुतीचा झेंडा; भाजपचे अरुण पाटील अध्यक्ष, तर भाग्यश्री भोईर उपाध्यक्ष

लाडक्या बहिणींना मुंबई बँकेतून शून्य टक्के व्याजदराने उद्योगधंद्यासाठी कर्ज देणारी योजनाही त्यांनीच प्रत्यक्षात आणली. सहकार क्षेत्राशी निगडित प्रश्न विधिमंडळात सातत्याने ते मांडत राहिले आहेत.

Pravin Darekar
Mumbai Police MD Seizure: वाडीबंदरला ‘एमडी’साठीचे रसायन जप्त; कारखान्याचे धागेदोरे उघड

भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड ही त्यांच्या सहकारातील योगदानाची पोचपावती समजली जाते. भारतातील सर्व क्षेत्रांतील सहकारी चळवळीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिखर संस्थेवर त्यांची संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल राज्य सरकार, विधिमंडळ आणि सहकार क्षेत्रातून प्रवीण दरेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news