File Photo
File Photo

प्रफुल पटेल यांची १८० कोटींची संपत्ती ईडीने केली परत

Published on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्या वरळीच्या सीजॉय हाऊसमधील १८० कोटी रुपयांची दोन वर्षापूर्वी जप्त केलेली संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना चक्क परत केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच याप्रकरणी त्यांना क्लिनचीट मिळाली होती. Praful Patel

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर केंद्रात एनडीएचे सरकार येणार हे स्पष्ट होताच ईडीने जप्तीची कारवाई रद्द केल्याने विरोधकांनी मात्र केंद्र सरकार व ईडीला धारेवर धरले आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात महायुती सरकारमध्ये सामील झाल्यावर ८ महिन्यातच पटेल यांच्या एअर इंडिया-इंडि. न एअरलाईन्स विलीनीकरण प्रकरणी करण्यात आलेल्या मनी लाँड्रिंगच्या आरोपातून सीबीआयने क्लीन चिट दिली होती. आता पटेल हे केंद्रीय मंत्रीमंडळात सहभागी होऊ शकतात. विशेष म्हणजे पटेल यांच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार शिखर बँकेच्या घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली.

वरळीतील सीजे हाऊस येथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या मजल्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत २०२२ मध्ये केली होती. या फ्लॅटसची किंमत १८० कोटी आहे. फरार अर्थिक गुन्हेगार असिफ आणि जुनेद यांची आई हजरा मेमनकडून प्रफुल पटेल यांनी ही मालमत्ता खरेदी करताना मनी लॉड्रिग केल्याचा ठपका ईडीने ठेवला. २०२२ मध्ये प्रफुल्ल पटेल, त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीचे किमान सात फ्लॅट ईडीने तेव्हा जप्त केले. त्यांच्यावर गैंगस्टर इक्बाल मिर्चीच्या पत्नीकडून बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होता. ईडीने कारवाई केलेल्या मालमत्तेतील दोन मजले गुंड इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबाचे होते, असा आरोप होता. ईडीच्या दाव्यानुसार हा करार २००७ मध्ये झाला. अर्थात प्रफुल पटेल यांनी हा आरोप फेटाळून लावला. ईडी पीएमएलए कायद्यांतर्गत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करत होती. या प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर २०१९ मध्ये प्रफुल पटेल यांची चौकशी करण्यात आली. Praful Patel

इक्बाल मिर्चीची संपत्ती शाहांनी सोडवली : राऊत

ईडीने माझीसुद्धा संपत्ती जप्त केली आहे. पण मी दुसऱ्या पक्षात गेलो नाही. मी जर मी दुसऱ्या पक्षात गेलो असतो, तर माझीही संपत्ती सोडवली असती, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हल्ला चढविला. प्रफुल्ल पटेल यांना मंत्री व्हायचे आहे, म्हणून इक्बाल मिर्चीची संपत्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोडवली, असा आरोपही त्यांनी केला. प्रफुल्ल पटेल यांच्यासारखा न्याय सर्वांना मिळावा असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news