Mumbai | प्रफुल्ल पटेल, भुजबळ यांच्याकडून शरद पवार यांची रुग्णालयात भेट

मुंबई : खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
मुंबई : खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
Published on: 
Updated on: 

मुंबई : ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांना बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विविध राजकीय नेते रुग्णालयात भेट देत आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयाचे उपसमन्वयक डॉ. प्रतीत समदानी यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यांना कफचा त्रास असून, श्वसनमार्गाचा संसर्ग झाला आहे. मात्र, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.