Prabhadevi bridge : प्रभादेवी पुलाची आणखी एक बैठक ठरली निष्फळ

सर्व 19 इमारतींचा समूह पुनर्विकास करून त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी रहिवाशांची मागणी
Prabhadevi bridge meeting failed
प्रभादेवी पुलाची आणखी एक बैठक ठरली निष्फळ pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : सर्व 19 इमारतींच्या समूह पुनर्विकासाची मागणी पूर्ण न करताच बुधवारी पूल बंद करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न बुधवारी बाधित रहिवाशांनी हाणून पाडला. यानंतर गुरुवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात रहिवाशांबरोबर बैठक झाली, मात्र ती निष्फळ ठरली.

प्रशासनाने पूल बंद करावा, रहिवाशांनी आंदोलन करावे आणि मग एक बैठक घेऊन प्रश्न तसाच अनुत्तरित ठेवावा ही पुनरावृत्ती प्रभादेवी पुलाबाबत सुरू आहे. एप्रिल महिन्यात अशाच प्रकारे पूल बंद करण्याची घोषणा झाल्यानंतर बैठका झाल्या होत्या. मात्र काहीही पदरात पडले नव्हते.

वरळी-शिवडी उन्नत रस्ता बांधण्यासाठी प्रभादेवी पूल तोडण्यात येणार आहे. येथील दोन इमारतींतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठवले जाईल, असे सांगितले जाते. मात्र सर्व 19 इमारतींचा समूह पुनर्विकास करून त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी रहिवाशांची मागणी आहे. तसे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी एप्रिलमध्ये दिलेही होते. मात्र त्याचा लेखी आदेश निघण्यापूर्वीच रहिवाशांचा विरोध डावलून पूल बंद करण्याचा प्रयत्न बुधवारी रात्री करण्यात आला.

Prabhadevi bridge meeting failed
Traffic police accident : दादरला हवालदाराच्या अंगावरच घातला ट्रक

गुरुवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात रहिवाशांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. त्यातून अद्याप काहीही निष्पन्न झालेले नाही. बैठकीला एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील उपस्थित असल्याची माहिती रहिवासी श्रीराम पवार यांनी दिली. दादर व भोईवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारीही येथे उपस्थित होते. लवकरच एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत एमएमआरडीएकडून काहीही माहिती देण्यात आली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.