Traffic police accident : दादरला हवालदाराच्या अंगावरच घातला ट्रक

वेळीच बाजुला झाल्याने बचावला, ट्रकचालक ताब्यात
Traffic police accident
दादरला हवालदाराच्या अंगावरच घातला ट्रकpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : वाहनचालकांची मुजोरी व बेजबाबदारपणाचे वाहतूक पोलीस शिकार बनत आहेत. चार दिवसांपूर्वी वरळी सी-लिंकवर वाहतूक नियोजन करणार्‍या एका हवालदाराला कारने उडवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना गुरुवारी दादारमधील शिवसेना भवनासमोर एका वाहतूक पोलीस कर्मचार्‍याच्या अंगावर ट्रक घालण्याचा धक्कादायक प्रकार घडला. वेळीच बाजूला झाल्याने ते यातून वाचले आहेत. ही संपूर्ण घटना कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

शिवसेना भवनासमोर नेहमी गर्दी असते. त्यामुळे येथील सिग्नलजवळ पोलीस वाहतूक कर्मचारी विश्वास बंडगर वाहतूक नियोजन करीत होते. यावेळी अचानक सिग्नल तोडून जाणार्‍या ट्रकला बंडगर यांनी अडवले. टिळक ब्रिजवर ट्रॅफिक असल्यामुळे दुसर्‍या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. ट्रकचालक मात्र काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यामुळे बंडगर यांनी ट्रकच्या समोर येत नंबर प्लेटचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रक त्यांच्या अंगावर घातला. वेळीच बंडगर बाजूला झाले नाहीतर ट्रकखाली आले असते. ट्रकचालकाने तेथून पळ काढला, मात्र काही अंतरावर पोलिसांनी त्याला अडवून ताब्यात घेतले. ट्रकचालकाची अधिकची माहिती अद्याप मिळाली नाही.

Traffic police accident
Bombay High Court: अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षात प्रवेश देण्याच्या निर्णयामुळे शैक्षणिक दर्जाला धक्का- हायकोर्ट

मंगळवारी वरळी सी-लिंकला जोडणार्‍या पॉईंटवर वाहतुकीचे नियोजन करीत असताना एका कारने उडवल्याने हवालदार दत्तात्रय कुंभार यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या सोबतच्या महिला पोलीस रिद्धी पाटील जखमी झाल्या होत्या. मुंबईतील वाहतूक पोलीस अलीकडे अशा अपघातांचे शिकार होण्याचे प्रमाण वाढते आहे. वाहतूक पोलीस भरचौकात आणि अनेकदा थेट वाहतुकीच्या तोंडी उभे असतात. भरधाव वाहनांवरील नियंत्रण सुटले की, पहिला धोका त्यांनाच निर्माण होतो. याबद्दल आता वाहतूक व्यवस्थेत व नियोजनात बदल करण्याची मागणी होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.