ग्रँटरोड येथील कुंटनखान्यावर कारवाई

वेश्यादलाल महिलेस अटक ; तीन महिलांची सुटका
police raid on kuntankhana in Grantroad
ग्रँटरोड येथील एका कुंटनखान्यात पोलिसांनी कारवाई केली.Pudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : ग्रँटरोड येथील एका कुंटनखान्यात डी. बी. मार्ग पोलिसांनी कारवाई करुन वेश्यादलाल महिलेस अटक तर तीन महिलांची सुटका केली. या तिघींनाही मेडीकलनंतर चेंबूरच्या नवजीवन महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

police raid on kuntankhana in Grantroad
कोल्हापुरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

गेल्याच आठवड्यात ग्रँटरोटच्या दोन कुंटखान्यात पोलिसांनी छापा टाकून तिथे चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक करुन बारा महिलांची सुटका केली होती. ही कारवाई सुरु असातनाच ओम इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील अशाच प्रकारे सेक्स रॅकेट चालत काही महिलांना जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

police raid on kuntankhana in Grantroad
मध्यवर्ती व्हीनस कॉर्नरवरील हायप्रोफाईल वेश्या अड्ड्याचा पर्दाफाश

या माहितीनंतर पोलिसांनी ओम इमारतीच्या रुम क्रमांक बारामध्ये छापा टाकला आणि तीन महिलांची पोलिसांनी सुटका केली. याच गुन्ह्यांत नंतर रेखा पियो बिस्वास या वेश्यादलाल महिलेस पोलिसांनी अटक केली. तिच्याविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर तिला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत कैलास यादव याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा शोध सुरू आहे.

police raid on kuntankhana in Grantroad
बारामती कारवाई : वेश्या व्यवसायावर कारवाई करत दोन महिलांची सुटका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news