मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षांच्या कार्यकाळात देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे, अशा शब्दांत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मोदी सरकारच्या तपपूर्तीचा आढावा घेतला. भाजप प्रदेश कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
गेल्या बारा वर्षांच्या कालावधीत कोविड, रशिया - युक्रेन युद्ध अशा अनेक आंतरराष्ट्रीय समस्या निर्माण झाल्या. मात्र पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक संकटाचे संधीत रूपांतर केले.
त्यांच्या नेतृत्वात झालेले ९ मुक्त व्यापार करार, विकसित देशांची बाजारपेठ ही भारतातील उद्योजक, शेतकरी, मच्छीमार, महिला उद्योजिकांना खुली केली. त्यांना नव्या संधी, रोजगार आणि व्यापार उपलब्ध करून देत भारताला वेगाने पुढे नेण्याचे काम करत आहे. मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याचे काम केल्याचे गाेयल म्हणाले.

मोदी यांना ३३ देशांनी आपल्या सर्वोच्च सन्मानाने त्यांना गौरवले आहे. अलीकडेच फ्रान्सच्या दौऱ्याहून परतलेल्या पंतप्रधानांनी अनेक देशांच्या नेत्यांशी केलेली द्विपक्षीय चर्चा, युके आणि भारतामध्ये झालेला मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू करण्याच्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम लवकरच पहायाला मिळतील, असा दावाही गोयल यांनी केला.
जन धन योजनेअंतर्गत ५५ कोटींहून अधिक बँक खाती.
लॉकडाऊनपासून ८१ कोटींहून अधिक नागरिकांना मोफत रेशन.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ६० कोटींहून अधिक आरोग्यकार्ड जारी केली.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेने ५८ कोटींहून अधिक लोकांना भक्कम सुरक्षाकवच प्रदान केले.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ४ कोटींहून अधिक कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध दिली.
उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ११ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले.
स्वच्छ भारत मिशनने १२ कोटींहून अधिक शौचालये बांधून दिली.