

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर आम्ही अराजकता पसरू देणार नाही. आपण आपल्या देशात अनैतिकरित्या राहणाऱ्या लोकांना का सहन करायचे ? एक एक माणूस तीन तीन ठिकाणी मतदार राहूच शकत नाही.
देशाची जनता खरगे आणि राहुल गांधीना अपशब्द बोलण्याबद्दल कधीच माफ करणार नाही, अशी टीका केली. केंद्रीय वाणिज्य मंत्री, खासदार पीयूष गोयल यांनी केली.
उत्तर मुंबईत भाजप महायुतीच्यावतीने 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ!' पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खा. गोयल बोलत होते.
या वेळी आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, महाराष्ट्र प्रदेश भाजप सरचिटणीस आमदार योगेश सागर, आमदार अतुल भातखळकर, आ. मनिषा चौधरी, आ. संजय उपाध्याय, प्रकाश सुर्वे, सभागृह नेते गणेश खणकर, प्रकाश दरेकर, जिल्हाध्यक्ष दीपक बाळा तावडे, मुंबई भाजप सरचिटणीस विनोद शेलार, आरपीआयचे रमेश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस नेते इंद्रपाल सिंह उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद पुतळा गोरागांधी बोरीवली पश्चिम येथून सुरू झालेल्या या रॅली मध्ये वकील, डॉक्टर, अनेक महिला संघटना, सहभागी झाले होते. या वेळी नागरिकांनी 'लोकतंत्र बचाव अराजकता हटाव' आणि 'देश का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान' अशा घोषणा दिल्या. कांदिवली पश्चिम येथील सप्ताह मैदानात जनसभेत रॅलीचा समारोप करण्यात आला.