कांदिवली ः महानगर पालिकेच्या माध्यमातून माघी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे.कांदिवली पश्चिमेला कांदिवली गावठण विसर्जन तलावाच्या बाजूलाच निर्माण केलेल्या कृत्रिम तलावात एकूण 310 घरगुती श्री चे विसर्जन करण्यात आले. तसेनैसर्गिक तलावात घरगुती 35 आणि सार्वजनिक 13 श्री मूर्तिचे निर्विघ्नपणे विसर्जन करण्यात आले. रात्रौ 2 वाजता शेवटचे विसर्जन पार पडले.
कांदिवली पश्चिमेला एकूण तीन नैसर्गिक तलाव आहेत. पालिकेने माघी गणेशोत्सवात गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. कांदिवली गावठाण तलावात यंग स्टार क्रीडा मंडळाकडून गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते.

नैसर्गिक तलावाच्या बाजूलाच पालिकेने कृत्रिम तलावाची निर्मिती करून, कृत्रिम तलावामध्येच घरगुती श्री चे विसर्जन करण्याच्या सूचना, मंडळाना दिल्या होत्या. त्यामुळे यंग स्टार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या वर्षी कृत्रिम तलावात घरगुती दीड दिवसांचे 250, तीन दिवसांच्या 60 गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन केले आणि 5 व्या दिवशी घरगुती 25 आणि सार्वजनिक 13 गणेशमूर्तींचे नैसर्गिक तलावात निर्विघ्नपणे विसर्जन पार पाडले. काही सार्वजनिक मंडळानी वाजत-गाजत उशीरा गणपती बाप्पांना विसर्जनासाठी आणल्याने रात्री 2 वाजता शेवटच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.