

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात राष्ट्रवादी कोणाची? हा वाद निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. अजित पवार आणि शरद पवार गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. शरद पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत अजित पवार यांना प्रश्न उपस्थित केला आहे. (Pawar vs Awhad)
राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) दोन दिवसाच्या निर्धार नवपर्वाच्या वैचारिक मंथन शिबिर रायगडमधील कर्जतमध्ये आयोजित केले होते शुक्रवारी (दि.१) झालेल्या समारोप भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटासंदर्भात बरेच गौप्यस्फोट केले. यानंतर शरद पवार गटाकडूनही त्यांना जोरदार प्रतित्यूर मिळू लागले आहे. जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. दरम्यान, अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या वाढलेल्या पोटाबद्दल वक्तव्य केले होते. आता जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक फोटो आपल्या 'X' अकाउंटवर पोस्ट केली आहे. ही पोस्टची राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चा होवू लागली आहे. आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,"दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन 6 pack abs केले असतील; पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो.. haha…
जितेंद्र आव्हाड यांनी "तुम्ही व्यायाम करुन 6 pack abs केले असतील; पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो" असं म्हणतं अजित पवारांचा फोटो शेअर केला होता. ती पोस्ट रिपोस्ट करत त्यांनी अजित पवार यांना सवाल केला आहे की,"दादा तुम्ही माझ्यावर वैयक्तिक बोलला नसतात तर मी तर आपल्या विरोधात एक शब्द काढला नव्हता; मग माझ्यावर दर वेळेस वयक्तिक टीका कश्यासाठी?, असा सवालही त्यांनी केला आहे. आता अजित पवार आव्हाडांच्या पोस्टला काय उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.