Paralcha Raja Ganpati: यंदाची पंढरीची वारी…परळच्या राजाच्या दारी!

८० वर्षांची परंपरा; पंढरपूर मंदिराची प्रतिकृती, चंद्रभागेचा तीर आणि संतांच्या पालख्यांचे देखणे चित्रण
Paralcha Raja Ganpati
Paralcha Raja GanpatiPudhari
Published on
Updated on

मुंबई: ऐंशी वर्षांची परंपरा अपार, परळमध्ये झाले पंढरपूर साकार |वारी आली राजाच्या दारी, विठ्ठलरूपी माझा बाप्पा वारकरी|असे म्हणत परळ नरेपार्क येथील 'परळचा राजा'च्या या भव्य मंडपात पंढरपूरच्या मुख्य मंदिराची प्रतिकृती, चंद्रभागेचा तीर, आणि संतांच्या पालख्यांचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे.

यंदा 'परळच्या राजा' ने वारकऱ्याचे रूप साकारले आहे. बाप्पाच्या दरबारात विठ्ठल भक्तीचा आणि पंढरीच्या वारीचा अप्रतिम सोहळा पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये, सजावटीमध्ये विठुरायाची विविध रूपे आणि वारकरी संस्कृतीची झलक स्पष्टपणे दिसून येते.

देखावा साकारणारे कला दिग्दर्शक अमन विधाते यांनी सांगितले कि, प्रति पंढरपूरचा हा देखावा साकारण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला. ३०-४० कारागीर रोज त्यासाठी काम करत होते. देखाव्याचा मंडप १६० फूट *९० फूट आहे.

या देखाव्यामध्ये चंद्रभागा नदी, विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती, मंदिराचा गाभारा, मंदिरातील गरुड खांब, तुकाराम गाथा अशा महत्वाच्या गोष्टींचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे देखाव्यातील साकारलेल्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये पंढरपूर येथील मूळ चंद्रभागा नदीतील पाणी आणले आहे.

Paralcha Raja Ganpati
Kurla One Inch Ganpati: अवघा १ इंचाचा गणराया पाहिलात का? शेषनागाच्या फण्याखालील ‘लिटिल मास्टर’ची कुर्ल्यात चर्चा

मंडळाचे अध्यक्ष अभिषेक परब यांनी सांगितले, दरवर्षी लाखो वारकरी आषाढी-कार्तिकी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरची पायी वारी करतात. पण जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी परळच्या राजाच्या मंडपातच पंढरीचे विठ्ठल मंदिर आणि तिथला भक्तीमय परिसर हुबेहूब उभारण्याचे आम्ही ठरविले. त्यासाठी मंडळातील काही सदस्यांनी पंढरपूरला भेट दिली.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गाभारा, गरुड खांब आदींची पाहणी करून देखाव्याचे नियोजन केले. त्यामुळे प्रति पंढपूरचा हा देखावा साकारण्यास मदत झाली.

Paralcha Raja Ganpati
BMC Engineers Transfer: मुंबई महापालिकेत अभियंत्यांच्या बदल्यांचा नवा नियम! ८३६ अर्ज, १,६०० हून अधिक जण पात्र

कान तृप्त करणारा जयघोष

देखाव्यामध्ये ढोल-ताशांच्या गजरासोबतच टाळ-मृदंगाचा नाद आणि अभंगांची सुश्राव्य सुरावली आणि 'ग्यानबा-तुकाराम' आणि 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल'चा कान तृप्त करणारा जयघोष ऐकायला मिळत आहे. हा देखावा म्हणजे केवळ एक सजावट नसून, ती भक्ताच्या मनातील विठ्ठल आणि गणपतीप्रती असलेल्या अथांग श्रद्धेची पावती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news