Salman Khan shooting case | मूसेवाला प्रमाणेच सलमानचा करणार होते गेम! बिश्नोई गँगचे PAK कनेक्शन उघड

पनवेल पोलिसांचे बिश्नोई टोळीतील ५ जणांविरुद्ध आरोपपत्र
Salman Khan shooting case
पनवेल पोलिसांकडून बिश्नोई टोळीतील ५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल.File photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan shooting case) याच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील अटकेत असलेल्या ५ संशयित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. संशयित आरोपी पाकिस्तानमधून एके- ४७ रायफल्स, एके -९२ रायफल्स आणि एम-१६ रायफल्स खरेदी करण्याच्या तयारीत होते. बिष्णोई टोळीने सलमान खानला मारण्यासाठी २५ लाख रुपयांची सुपारी जाहीर केली होती. तसेच लॉरेन्स बिश्नोई टोळीने (Bishnoi gang) पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला प्रमाणेच सलमानला मारण्याची योजना आखली होती आणि त्यासाठी पाकिस्तानमधून शस्त्रे मागवली जात होती, असे पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे.

सलमान खानच्या घरासमोर १४ एप्रिल रोजी काही अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोळीबार केला होता. या प्रकरणी पनवेल मॅजिस्ट्रेट कोर्टात नुकतेच दाखल करण्यात आलेले हे आरोपपत्र ३५० पानांचे आहे. यात पंजाबी गायक सिद्धू मूसवाला याच्या हत्येप्रमाणेच सलमान खानच्या नियोजित हल्ल्याचा तपशील देण्यात आला आहे. ही घटना एकतर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान किंवा तो पनवेल फार्महाऊस सोडत असताना घडली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Salman Khan shooting case
Salman Khan residence firing case | सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीने कोठडीत जीवन संपवले

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुप्तचरांच्या सखोल विश्लेषणात, ज्यामध्ये मोबाईल फोनची तांत्रिक तपासणी, व्हॉट्सॲप ग्रुप फॉर्मेशन, टॉवर लोकेशन्स आणि प्रत्यक्षदर्शी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्सचा समावेश आहे. यातून AK ४७ सह पाकिस्तानमधून अत्याधुनिक शस्त्रे मागवून सलमान खानला मारण्याचा कट उघड झाला आहे.

आरोपत्रात पाच जणांची नावे

या आरोपपत्रात बिश्नोई टोळीतील धनंजय तापसिंग उर्फ ​​अजय कश्यप (वय २८), गौतम विनोद भाटिया (२९), वास्पी मेहमूद खान उर्फ ​​चायना (३६), रिझवान हसन उर्फ ​​जावेद खान (२५) आणि दीपक हवासिंग उर्फ ​​जॉन वाल्मी (३०) या पाच सदस्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे (IPC कलम १२० बी), गुन्हेगारी कृत्यासाठी प्रवृत्त करणे (कलम ११५) आणि गुन्हेगारी धमकी (कलम ५०६ (२)) असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

२५ लाख रुपयांची दिली होती सुपारी

सलमान खान याच्यावर नियोजित हल्ल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पनवेलचे पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी एप्रिलच्या सुरुवातीला तपास सुरू झाला. लॉरेन्स बिश्नोई याने त्याच्या टोळीतील सदस्यांना २५ लाख रुपयांची सुपारी देऊ केल्याचे उघड झाले आहे. या टोळीतील १५-१६ सदस्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे संवाद साधला होता, ज्यात बिश्नोईचा कॅनडा येथील चुलत भाऊ अनमोल बिश्नोई, गोल्डी ब्रार, अजय कश्यप, विनोद भाटिया, वास्पी मेहमूद खान उर्फ ​​चायना आणि रिझवान हसन खान यांचा समावेश होता.

Salman Khan shooting case
Salman Khan : सलमान खानवर हल्‍ल्‍याचा कट; बिष्णोई टोळीतील ४ जणांना अटक

AK-47, M16 आणि M5 यांसारख्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या पाकिस्तानमधील सुखा शूटर आणि डोगर यांचीही पोलिसांनी ओळख पटवली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news