

विक्रम बाबर
पनवेल प्रतिनिधी :- मुबंईत आज (दि.८ ) पहाटे पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका रेल्वे सेवेवर झाला आहे. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेसह, हर्बर रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. त्या मुळे सकाळी कामानिम्मिताने बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना रेल्वे स्थानकात थांबावे लागले आहे.
हर्बर मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानकात सध्या गर्दी झाली आहे. गेली एक ते दीड तास एक ही ट्रेन न आल्यामुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी झाली आहे. मुबई पडलेल्या पावसामुळे, मानखुर्द आणि चुनाभट्टी रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने सीएसटीकडे जाणाऱ्या रेल्वे जागेवर उभ्या राहिल्या आहेत, परिणामी हार्बर रेल्वे मार्ग ठप्प पडला असून, पनवेल ते वाशी अशी रेल्वे सेवा सुरू असून या सेवेला देखील विलंब होत आहे.