Paneer Adulteration: बाजारातील भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल?

दुधातील सत्व काढून बनवलेले पनीर विकण्याचे प्रकार वाढले
Food Safety
Food SafetyPudhari
Published on
Updated on

मुंबई: दुधातील सत्व काढून घेत पनीरमध्ये भेसळ करून ते किरकोळ बाजारात विकण्याचे प्रकार वाढले आहेत. या भेसळ पनीरमुळे ग्राहकांची मोठी फसणूक होत आहे. पनीर भेसळ करणारी मोठी टोळी सक्रिय आहे. त्याविरोधात अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र तरी पनीरची भेसळ सर्वसामान्यांनाही ओळखता येणे आवश्यक झाले आहे.

पनीर भेसळ केल्यास होणार कारवाई होते?

पनीर भेसळबाबत सर्वसामान्य माणसाने जरी तक्रार केली. तरी अन्न औषध प्रशासन त्या विरोधात कारवाई करते. कारवाईत दुकानात सर्व साठा ताब्यात घेतला जातो. दोषीचा परवाना रद्द होऊन कठोर कारवाई होते असे अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर डुबे यांनी सांगितले.

Food Safety
Goat Meat Price Rise: मुंबईत बकऱ्यांची आवक घटली; ईदला मटण महागण्याची शक्यता

पनीर भेसळ कशी ओळखाल?

बनावट पनीर बनविण्यासाठी मुख्यत्वे दुधाचा वापर केला जातो. दुधातील फॅट काढून, त्याची पावडर बनवितात. त्यानंतर ती पावडर पाण्यात मिसळून पांढरे पाणी तयार करतात. मात्र, या पाण्यात फॅट नसल्याने पनीर तयार होऊ शकत नाही. त्यासाठी या पाण्यात खाद्यतेल मिसळतात. खाद्यतेलातील फॅट यामध्ये टाकून तसेच एमएलसी फायर हा वैज्ञानिक प्रयोग करून बनावट पनीर तयार करतात. हे पनीर आरोग्यास घातक असते.

पनीर व चिज ॲनालॉग मध्ये फरक !

पनीर हा फक्त दुधापासून बनविला जातो. डेअरी ॲनालॉग हा दूध व्यतिरिक्त इतर खाद्यतेल, स्टार्च, इमल्सीफायर व इतर घटक वापरून बनविलेला पदार्थ असतो. तो पनीर सारखा दिसतो. पण पनीर म्हणून त्याला मान्यता नाही. यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत आहे.

भेसळ केलेले 612 लीटर दूध

दुधाच्या नामांकित कंपन्यांच्या पिशव्या फाडून त्यामध्ये पाण्याची भेसळ करीत असल्याप्रकरणी 5 आरोपीना एप्रिल महिन्यात अन्न प्रशासनाने ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून 36 हजार 219 इतके किंमतीचे 612 लीटर दूध नष्ट करण्यात आले.

कुठे तक्रार कराल?

पनीर खरेदी करताना तुम्हाला काही संशयास्पद आढळल्यास अन्न व औषध प्रशासन कार्यालयात ई-मेल द्वारे किंवा 1800 222 365 या हेल्पलाइनवर तक्रार करू शकता.

Food Safety
Bus fire Sion Panvel: सायन-पनवेल मार्गावर बर्निंग बसचा थरार; चालकाच्या प्रसंगावधानामुळे 22 प्रवासी बचावले

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

  • पनीर घेताना पॅकबंद उत्पादनावर लेबल काळजीपूर्वक वाचा. ॲनालॉग असा उल्लेख आहे का ते तपासा.

  • सुटे पनीर घेताना ते शुद्ध

  • दुधापासून बनविले आहेत का , याची दुकानदाराकडून खात्री करून घ्या .

  • संशय आल्यास बिल घ्या.

  • हॉटेलमध्ये मेनू कार्डवर पनीर आणि चिज ॲनालॉग असा उल्लेख पाहून ऑर्डर करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news