Crawford Market raid : क्रॉफर्ड मार्केटमध्ये पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने जप्त

ही उत्पादने मुंबईच्या बाजारात कशा मार्गाने पोहोचली, याचा तपास सुरू
Crawford Market raid
Crawford Market raidpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्यप्रसाधनांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून सुमारे १२ लाख रुपये किमतीची सौंदर्यप्रसाधने जप्त केली. या कारवाईनंतर संबंधित व्यापारी आणि पुरवठादारांची एम आरएमार्ग पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात येत असून, ही उत्पादने मुंबईच्या बाजारात कशा मार्गाने पोहोचली, याचा तपास सुरू आहे.

कारवाईदरम्यान विविध प्रकारची पाकिस्तानी बनावटीची फेस क्रीम, लोशन, साबण, सौंदर्यप्रसाधने आणि इतर कॉस्मेटिक उत्पादने जप्त करण्यात आली. या उत्पादनांची भारतात आयात करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, सीमाशुल्क नियमांचे पालन आणि वैध परवानग्या यांची पडताळणी संबंधित यंत्रणांकडून केली जात आहे.

Crawford Market raid
Nanded Crime : नांदेडमध्ये पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांच्या गोदामावर छापा; ४० लाखांचा माल जप्त

प्राथमिक तपासात ही उत्पादने अनधिकृत मार्गाने बाजारात आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुरवठादार, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांची साखळी तपासली जात असून, या मागे मोठे वितरण नेटवर्क कार्यरत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

जप्त सौंदर्यप्रसाधनांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर संबंधितांवर सीमाशुल्क कायदा, परकीय व्यापार नियम आणि इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

Crawford Market raid
Palghar crime | मेंढवण खिंडीत 28 लाखांचा गुटखा जप्त; फॉर्च्युनर कारसह दोघांवर गुन्हा

काही दिवसांपासून अनधिकृत आयात आणि बंदी अथवा निर्बंध असलेल्या परदेशी उत्पादनांची विक्री रोखण्यासाठी मुंबईतील घाऊक बाजारपेठांमध्ये विशेष तपास मोहीम राबविली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news