Palghar crime | मेंढवण खिंडीत 28 लाखांचा गुटखा जप्त; फॉर्च्युनर कारसह दोघांवर गुन्हा

याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली फॉर्च्युनर कारही ताब्यात घेण्यात आली
Palghar crime | मेंढवण खिंडीत 28 लाखांचा गुटखा जप्त; फॉर्च्युनर कारसह दोघांवर गुन्हा
Published on
Updated on

कासा : पोलिसांनी मोठी कारवाई करत मेंढवण खिंड परिसरात सुमारे 28 लाख 4 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूचा साठा जप्त केला. या प्रकरणी फॉर्च्युनर कारवरील अज्ञात चालकासह एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-48 पी-4968 क्रमांकाच्या फॉर्च्युनर कारमधून प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती कासा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 20 जून रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील मेंढवण खिंड परिसरात वाहनाची तपासणी करण्यात आली.

Palghar crime | मेंढवण खिंडीत 28 लाखांचा गुटखा जप्त; फॉर्च्युनर कारसह दोघांवर गुन्हा
Palghar Crime | गुजरातहून येणारा तब्बल ३८ लाखांचा गुटखा जप्त; गुटखा माफियांना कोणाचा आशीर्वाद?

तपासणीदरम्यान वाहनातून विविध प्रकारचा केशरयुक्त विमल पानमसाला, विमान पानमसाला तसेच V-1 तंबाखूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सुमारे 8 मोठ्या गोण्यांमधील विमल पानमसाला, 8 गोण्यांमधील विमान पानमसाला, 18 गोण्यांमधील V-1 तंबाखू असा एकूण लाखो रुपयांचा माल जप्त केला. याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली फॉर्च्युनर कारही ताब्यात घेण्यात आली.

Palghar crime | मेंढवण खिंडीत 28 लाखांचा गुटखा जप्त; फॉर्च्युनर कारसह दोघांवर गुन्हा
Gutkha smuggling : बुलढाण्यात गुटखा तस्करीचा पर्दाफाश! नाकाबंदीत ७० लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत एकूण 28 लाख 4 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी फॉर्च्युनर कारवरील अज्ञात चालक तसेच कल्पेश भोईर (रा. मांडवी, विरार, जि. पालघर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Palghar crime | मेंढवण खिंडीत 28 लाखांचा गुटखा जप्त; फॉर्च्युनर कारसह दोघांवर गुन्हा
Jalgaon crime news | जळगावात 'विमल'चा बंपर स्टॉक जप्त; एमआयडीसी पोलिसांची डिझो पेट्रोल पंपाजवळ धडक कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन डोंगरे करीत आहेत. प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूची गुजरातमधून विरार-मुंबई परिसरात विक्रीसाठी वाहतूक केली जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news