

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ‘पाडू’ (प्रिंटिंग ऑक्झिलियरी डिस्प्ले युनिट) यंत्राचा वापर करण्याच्या निर्णयावर ठाकरे सेना आणि मनसेने आक्षेप घेतल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्यावर खुलासा केला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास ‘पाडू’ या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, ‘पाडू’चा वापर सरसकट केला जाणार नाही.
तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरीत्या त्याचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. या यंत्राची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी दिली.