लाडकी बहीण योजनेच्या कामाचे शिक्षकांना आदेश

नवी मुंबई पालिका उपआयुक्तांकडून परिपत्रक
Mazhi Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेच्या कामाचे शिक्षकांना आदेशfile photo

मुंबई : अशैक्षणिक कामे नको अशी मागणी राज्यातील शिक्षकांची असताना आता सरकारने आणलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या नव्या योजनेचेही काम आता शिक्षकांना करण्याचे आदेश दिले जात आहेत. नवी मुंबई महानगरपालिका उप आयुक्त (शिक्षण) यांनी यासंदर्भातील परिपत्रक मुख्याध्यापकांना पाठवले आहे.

शाळेतील एक वर्गखोली, संगणक, इंटरनेट सुविधा व बालवाडी शिक्षकांपासून इयता दहावीपर्यंत सर्व शिक्षकांना रोटेशन पद्धतीने नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात महामुंबईतील शिक्षकांनी नाराजी व्यक्त करत आता या योजनेचेही काम आम्ही करायचे का, असा सवाल केला आहे.

Mazhi Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुटीच्या दिवशीही

उप आयुक्तांचे मुख्याध्यापकांना आदेश

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' अंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. जुलै २०२४ पासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेच्या पात्र महिलांचे अर्ज मुदतीत भरण्याचे काम राज्यभरात जोरात सुरु आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत महिलांची नोंदणी कमी वेळात आणि तत्काळ व्हावी यासाठी उप आयुक्त (शिक्षण) यांनी महापालिकेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना आदेश काढले आहेत. येत्या ३१ ऑगस्ट २०२४ या या कालावधीपर्यंत ही योजना यशस्वीपणे राबवण्याचेही म्हटले आहे. यामुळे आता महामुंबईतील शिक्षकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news