'झोपू' योजनेतील घरे विक्रीसाठी ना - हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन देणार

मंत्री अतुल सावे यांची विधान परिषदेत माहिती
Legislative Council of Atul Save
'झोपू' योजनेतील घरे विक्रीसाठी ना - हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन देणार असल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली. Pudhari News Network

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विक्री करण्यासाठी ना - हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार असून अर्ज केल्यानंतर 45 दिवसांत प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी आज (दि.४) विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

Legislative Council of Atul Save
मुंबई: झोपेत चालत जाऊन तरुणाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

प्रवीण दरेकर, कपिल पाटील, जयंत पाटील यांनी प्रश्न मांडले.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणारे ना- हरकत प्रमाणपत्रबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. यास मंत्री अतुल सावे यांनी उत्तर दिले. यावेळी सदस्य भाई गीरकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला. तर प्रवीण दरेकर, कपिल पाटील, जयंत पाटील यांनी प्रश्न मांडले.

Legislative Council of Atul Save
नवी मुंबई पालिका उभारणार टाकाऊ कपडे पुनर्प्रक्रिया प्रकल्प

घरे विकण्यासाठीच्या अनेक अटी शिथिल

मंत्री सावे म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठीच्या अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. तसेच ना - हरकत प्रमाणपत्र लवकरच ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करणार येणार आहे. तसेच झोपडपट्टी धारक मृत असल्यास त्याच्या वारसाने वारसा प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांनाही ना - हरकत प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची माहिती यावेळी मंत्री सावे यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news