नवी मुंबई पालिका उभारणार टाकाऊ कपडे पुनर्प्रक्रिया प्रकल्प

गरीब, गरजू नागरिकांना होणार फायदा; जनजागृतीसाठी पालिका आयुक्तांच्या बैठका
Navi Mumbai Municipality to set up waste clothes recycling project
कचरा म्हणून टाकल्या जाणाऱ्या कपड्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर सकारात्मक उत्तर शोधण्याच्या दृष्टीने वापरलेल्या कपड्यांवर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी अनोखा प्रकल्प नवी मुंबईत राबविण्यात येणार आहे. Navi Mumbai Municipality
निवडणुकीचे गणित जमवण्यासाठी माघार कोण घेणार?नवी मुंबई : सध्याच्या फॅशन ट्रेंड बदलाच्या प्रचंड गतिमान युगात फॅशन सायकल आता केवळ १५ दिवसांवर आली आहे. त्यामुळे कचरा म्हणून टाकल्या जाणाऱ्या कपड्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर सकारात्मक उत्तर शोधण्याच्या दृष्टीने वापरलेल्या कपड्यांवर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी अनोखा प्रकल्प नवी मुंबईत राबविण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या वत्र मंत्रालयामार्फत ग्राहक वापरानंतरचे कपडे पुनर्प्रक्रियेचा प्रायोगिक प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून याविषयी जनजागृती करण्याकरीता पालिका क्षेत्रातील सोसायटी पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झाली.

Navi Mumbai Municipality to set up waste clothes recycling project
राणीबागेत गेल्या दोन वर्षांत ७१ प्राण्यांचा मृत्यू!

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दैनंदिन कचऱ्याचे ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे वर्गीकरण केले जात असताना त्यामधून टाकाऊ कपड्यांचेही स्वतंत्र वर्गीकरण करण्यात येऊन हे कपडे पुनर्वापरात आणण्याबाबतचा हा अभिनव प्रकल्प प्रायोगिक स्वरुपात राबविण्यासाठी नवी मुंबई शहराची निवड केल्याबद्दल केंद्र सरकारच्या वख मंत्रालयाचे पालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आभार मानले.

Navi Mumbai Municipality to set up waste clothes recycling project
मराठा आरक्षणात आता मागासवर्ग आयोग प्रतिवादी

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना केंद्रीय वस्त्र मंत्रालयाचे संचालक तपनकुमार राऊत यांनी नवी मुंबई शहर हे स्वच्छतेविषयी अतिशय जागरुकतेने काम करीत असून नाविन्यपूर्ण स्वच्छता उपक्रम राबविण्यात नेहमीच आघाडीवर असते, त्यामुळे हा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी नवी मुंबईचीनिवड करण्यात आली असल्याचे सांगितले..

Navi Mumbai Municipality to set up waste clothes recycling project
निवडणुकीचे गणित जमवण्यासाठी माघार कोण घेणार?

यामध्ये केंद्रीय वस्त्र समिती, नवी मुंबई पालिका व स्वयंसेवी संस्थांचा सहयोग असणार असून सोसायटी पातळीवर कपडे संकलन कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून नागरिकांकडून वापरात नसलेले, टाकून दिल्या जाणाऱ्या कपड्यांचा पुनर्वापर होऊ शकतो व त्यावर पुर्नप्रक्रिया करता येऊ शकते हे लक्षात घेत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रक्रियेत स्वयंसहाय्यता बचत गटांनाही काम मिळेल व महिलांचे सक्षमीकरण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news