

मुंबई : ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) साठी 28 जानेवारीचा दिवस अत्यंत लाभदायक ठरला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर कंपनीचा शेअर 5.77% नी वधारून 263.10 रुपयांवर पोहोचला. या तेजीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने जपानच्या मित्सुई ओ.एस.के. लाईन्स आणि दक्षिण कोरियाच्या सॅमसंग हेवी इंडस्ट्रीज सोबत केलेले धोरणात्मक करार होय.
या करारानुसार, दक्षिण कोरियामध्ये दोन अतिप्रचंड व्हेरी लार्ज इथेन कॅरियर्स बांधली जाणार आहेत. ही जहाजे ओपलसाठी अमेरिकेतून इथेन वायूची वाहतूक करतील.
प्रत्येक जहाजाची मालवाहू क्षमता 1 लाख घनमीटर असेल. ही जहाजे वर्ष 2028-29 पर्यंत भारतीय ताफ्यात सामील होतील. त्यांचे संचालन गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये स्थापन भारत इथेन वन आणि भारत इथेन टू या संयुक्त उपक्रमांद्वारे होईल.