Mumbai Dahi Handi Govinda Death: उत्सवाला गालबोट; दहीहंडी फोडताना मुंबईत एका गोविंदाचा मृत्यू

Dahi Handi 2025: मुंबईत दहीहंडीचा थरार सुरु आहे
Dahi Handi Govinda Death
Dahi Handi Govinda DeathPudhari News
Published on
Updated on

Dahi Handi 2025 Mumbai Govinda Death

मुंबई : मुंबईत दहीहंडीचा थरार सुरु आहे. दरम्यान, मुंबईत एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मानखुर्द बाल गोविंदा पथकातील हा गोविंदा आहे. मानखुर्द बाल गोविंदा पथकातील गोविंदा जगमोहन शिवकिरण चौधरीचा दहीहंडी फोडताना पडला. त्याला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेले असताना त्याचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत ३० गोविंदा जखमी तर १५ गोविंदांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. तर १५ जणांवर अजून उपचार सुरू आहेत.

दहीहंडी खेळताना दुपारपर्यंत ३० गोविंदा जखमी झाले असून जखमी झालेल्या गोविंदांवर केईएम, नायर, सायन, शताब्दी, जे जे, रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मानखुर्द येथील एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. १५ गोविंदांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

Dahi Handi Govinda Death
Thane Dahi Handi 10 Thar: ठाण्यात 'कोकण नगरचा राजा'चा विश्वविक्रम, दहीहंडीत 10 थर रचले

गोपाळकाल्यानिमित्त दहीहंडी फोडण्यासाठी रस्सीखेच सुरु होते. काही वेळा रचलेला थर कोसळून गोविंदा जखमी होतात. या जखमी गोविंदाना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी मुंबईतील सरकारी रुग्णालये सज्ज झाली आहेत. सर्व रुग्णालयांनी जखमी गोविंदांसाठी खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, आवश्यक ती औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत.

केईएम ५, नायर १, ट्रामा रुग्णालयात २, संलग्न रुग्णालयात ४ रुग्णालयात गोविंदांवर उपचार सुरु आहेत. या गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news