न्यूयॉर्क/मुंबई : वाढते जागतिक तापमान आणि शेतीमधील खतांचा समुद्रात जाणारा निचरा, यामुळे महासागरांमध्ये शेवाळाचे प्रमाण कमालीच्या वेगाने वाढत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा समुद्राच्या रेजीम शिफ्टचा (स्थित्यंतराचा) काळ असून, यामुळे भविष्यात पर्यावरणाचे मोठे नुकसान होऊ शकते. युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडाच्या संशोधकांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका शोधनिबंधात हा दावा केला आहे. शेवाळाचे प्रमाण वेगाने वाढल्याने तेथील जीव परिसंस्था धोक्यात आली आहे.
संशोधनानुसार, उष्णकटिबंधीय अटलांटिक आणि पश्चिम पॅसिफिक महासागरांमध्ये गेल्या दोन दशकांत शेवाळाचे प्रमाण दरवर्षी 13.4 टक्के या वेगाने वाढले आहे. विशेषतः, 2008 नंतर यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. ‘कॉलेज ऑफ मरीन सायन्स’चे प्राध्यापक चुआनमिन हू यांनी सांगितले की, 2008 पूर्वी सारगासो समुद्राचा अपवाद वगळता इतरत्र कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणात शेवाळ आढळत नव्हते. आता आपण कमी शेवाळ असलेल्या महासागराकडून अति-शेवाळ असलेल्या महासागराकडे वाटचाल करत आहोत.
शास्त्रज्ञांनी 2003 ते 2022 या कालावधीतील समुद्राच्या सुमारे 12 लाख उपग्रह फोटोंचे विश्लेषण करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीप लर्निंग मॉडेलचा वापर केला. या संशोधनातून असे समोर आले की, तरंगणाऱ्या शेवाळाचे क्षेत्रफळ प्रचंड वाढले असून, त्याचा परिणाम समुद्राच्या पाण्याच्या गुणधर्मांवर होत आहे.

गेल्या 20 वर्षांत अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरात शेवाळाच्या प्रमाणात वार्षिक 13.4 टक्के वाढ झाली आहे.
2010 नंतर महासागरांचे तापमान वेगाने वाढल्यामुळे शेवाळाच्या वाढीला मोठी चालना मिळाली.
पृष्ठभागावरील शेवाळाच्या जाड थरामुळे समुद्राच्या आत काळोख पसरून तिथली परिसंस्था धोक्यात येत आहे.
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशननेदेखील या वाढत्या शेवाळाच्या पट्ट्यांचे फोटो टिपले आहेत.