Nurse Job Fraud: नर्सच्या नोकरीचे आमिष; तरुणीला दोन महिलांकडून गंडा

26 वर्षांची तक्रारदार तरुणी तिच्या भावासोबत सायन येथे राहते.
Fraud Case
Fraud Casefile photo
Published on
Updated on

मुंबई : नर्सच्या नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन एका तरुणीची दोन महिलांनी फसवणूक केल्याचा प्रकार सायन परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमायरा आणि क्रितिका मेहरा नाव सांगणाऱ्या दोन्ही महिलांविरुद्ध सायन पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

26 वर्षांची तक्रारदार तरुणी तिच्या भावासोबत सायन येथे राहते. तिने नर्सिंगचे शिक्षण घेतले असून तिने नामांकित रुग्णालयात सेवा बजावली आहे. जानेवारीत तिने पार्टटाईम नोकरीसाठी एका संकेतस्थळावर माहिती अपलोड केली होती.

Fraud Case
Dharavi Redevelopment: धारावीत तळमजल्याच्या पात्रतेवरच वरच्या मजल्यावरील पात्रता निश्चित!

याच दरम्यान तिला अमायरा नावाच्या एका महिलेने कॉल करुन ती ग्लोबल केअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तिला होम नर्सची नोकरीसह चांगल्या पगाराची ऑफर दिली होती. तिने होकार दर्शविल्यानंतर तिच्याशी क्रितिका मेहरा या महिलेने संभाषण केले होते.

होम नर्ससाठी तिने तिच्याकडे युनिफॉर्म, आयडी कार्ड, ब्रॅच कोडसाठी, डिलीव्हरी चार्जेस, जॉब आणि बिल्डींग अग्रीमेंटसाठी पैशांची मागणी केली. चांगला पगार मिळत असल्याने तिने कुठलीही शहानिशा न करता त्यांनी दिलेल्या बँक खात्यात टप्याटप्याने चार लाख तीन हजार रुपये ट्रान्स्फर केले होते.

काही दिवसांनी तिला एक अग्रीमेंट पत्र पाठविण्यात आले होते. त्यात केअर सर्व्हिसेस कंपनीचे नाव आणि अंधेरी, डी. एन नगरचा पत्ता होता. तिला केअरटेकरसह नर्स म्हणून काम करावे लागेल असे नमूद करण्यात आले होते. याच दरम्यान तिला नोकरीचे नियुक्तीपत्र पाठविण्यात आले. मात्र तिची नोकरीची प्रोसेस पूर्ण न झाल्याने तिने तिला नोकरीवर ठेवले नाही.

Fraud Case
Mumbai flower market: फुलांच्या दरात प्रतिकिलो सरासरी 20 रुपयांची वाढ! प्रचंड उष्णतेमुळे फूलशेतीवर परिणाम

त्यानंतर क्रितिकाने तिला मॅसेज करुन पहिली प्रोसेस कॅन्सल झाली असून तिने भरलेली रक्कम तिच्या बँक खात्यात जमा होईल. त्यामुळे तिने नोकरीसाठी पुन्हा अर्ज करावे असे सांगितले. मात्र तिने तिला पैसे पाठविले नाही किंवा नर्स म्हणून नोकरी मिळवून दिली नाही.

नोकरीच्या आमिषाने अमायरा आणि क्रितीका या दोघींनी तिची फसवणुक केली होती. त्यामुळे तिने त्यांच्याविरुद्ध सायन पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमायरा आणि क्रितिका मेहरा यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news