Mumbai flower market: फुलांच्या दरात प्रतिकिलो सरासरी 20 रुपयांची वाढ! प्रचंड उष्णतेमुळे फूलशेतीवर परिणाम

सर्वप्रकारच्या फुलांची आवक घटली, विक्रीतही घट
Mumbai flower market
Mumbai flower marketPudhari
Published on
Updated on

मुंबई: सध्या उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे फूल शेतीवर परिणाम होत आहे. तापमान वाढल्याने नैसर्गिक फुलांची उत्पादनक्षमता कमी झाली असून मुंबईतील फूल बाजारात सर्वप्रकारच्या फुलांची आवक घटली आहे. घाऊक बाजारात फुलांच्या दरात प्रतिकिलो सरासरी 20 रुपये वाढ झाली आहे. फुलांची झालेली दरवाढ व सण, लग्नसराई कमी झाल्याने फुलांच्या विक्रीत घट झाल्याचे दादरमधील विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

मुंबईतील फुलांची मोठी बाजारपेठ म्हणून दादर फूल बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दादरबरोबर भायखळा याठिकाणी फुलांची बाजारपेठ आहे. फूल बाजारातील बहुतांश नैसर्गिक फुलांचे घाऊक विक्रेते हे थेट शेतकऱ्यांकडून फुले घेतात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, नाशिक जिल्ह्यातील चांदवड, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोळनेर, सातारा जिल्ह्यातील कास पठार व सांगली या जिल्ह्यांत फुलांचे उत्पादन होते.

Mumbai flower market
Thane News: टिटवाळा पुलाखाली पोलीस हवालदाराने संपवलं जीवन; कारण अस्पष्ट

दरम्यान, दोन महिन्यांपासून प्रचंड उष्णतेमुळे फूल शेतीवर परिणाम झाला असून फुलांचे उत्पादन कमी होत चालले आहे. त्यामुळे मुंबईतील फूल बाजारांत सर्वप्रकारच्या फुलांची आवक घटली असून त्याचा दरावर परिणाम होत आहे.

दुसरे म्हणजे, तापमानात झालेली वाढ व पाण्याच्या कमतरतेमुळे दोन दिवसांतच फुले सुकतात. त्याचा फटका फूल विक्रेत्यांना बसत आहे. जर उष्णतेची लाट अशीच राहिली, तर पुढील काळात फुलांच्या दरामध्ये आताच्या दरापेक्षा प्रतिकिलो आणखी 10 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे.

Mumbai flower market
Medical Admission Delay: प्रवेश प्रक्रियेतील विलंबाचा डॉक्टर विद्यार्थ्यांना मोठा फटका

दृष्टिक्षेपात : प्रतिकिलो दर

झेंडू (पिवळा व केशरी): पूर्वी 20 ते 30 रुपये, सध्या 40 ते 50 रुपये

शेवंती: पूर्वी 40 ते 60 रुपये, सध्या 80 ते 120 रुपये

मोगरा: पूर्वी 300 ते 400 रुपये, सध्या 600 ते 800 रुपये

निशिगंधा: पूर्वी 60 ते 80 रुपये, सध्या 100 ते 120 रुपये

गुलाब: पूर्वी 60 ते 80 रुपये, सध्या 100 ते 120 रुपये

याबाबत दादर येथील माँसाहेब मीनाताई फूल बाजारातील विक्रेते म्हणाले, दादर फूल बाजारात यापूर्वी दिवसाला 30 ट्रक सर्व प्रकारची फुले यायची. पण, आता दिवसाला 20 ट्रक येतात. फुलांची आवक कमी झाल्याने दरामध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर सण व लग्नसराई नसल्याने ग्राहकांकडून फुलांची म्हणावी तशी खरेदी होत नाही.

- दीपक रोकडे, फूल विक्रेते, माँसाहेब मीनाताई फूल बाजार, दादर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news