अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी १४ उमेदवारांच्या वैध नामनिर्देशनपत्रांपैकी ७ उमेदवारांची उमेदवारी मागे

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी १४ उमेदवारांच्या वैध नामनिर्देशनपत्रांपैकी ७ उमेदवारांची उमेदवारी मागे
Published on
Updated on

मुंबई उपनगर, पुढारी वृत्‍तसेवा : महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. यानुसार आज दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार आज दुपारी ३ वाजेपर्यंत सदर १४ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत ७ उमेदवारांपैकी एका उमेदवारास आपले बहुमूल्य मत देऊन नागरिकांना आपला मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे, अशी माहिती '१६६ अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

वैधपणे नामनिर्दिष्ट उमेदवारांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यांचा संक्षिप्त तपशील पुढील प्रमाणे:

१. श्री.निकोलस अल्मेडा (अपक्ष)

२. श्री.मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)

३. श्री. साकिब जफर ईमाम मल्लिक (अपक्ष)

४. श्री.राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)

५. श्री.चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)

६. श्री. पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)

७. श्री.चंदन चतुर्वेदी (अपक्ष)

अर्ज मागे घेतल्यानंतर मतदान प्रक्रियेसाठीच्या अंतिम यादीतील उमेदवारांचा संक्षिप्त तपशील पुढीलप्रमाणे :

१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२. श्री.बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)

३. श्री.मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

४. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)

५. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

६. श्री.मिलिंद कांबळे (अपक्ष)

७. श्री.राजेश त्रिपाठी (अपक्ष)

याच अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी 'अंधेरी पूर्व' विधानसभा मतदार संघाच्या दि. ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मतदार संघातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करण्याचे आवाहनही मतदारांना केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news