

Navi Mumbai News
नवी मुंबई : आज बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घणसोली डेपोत लागलेल्या आगीत एनएमएमटीच्या चार बस जळून खाक झाल्या. मेंटेनन्ससाठी उभ्या असलेल्या डिझेल बसला अचानक आग लागली. यावेळी या बसला लागून उभ्या केलेल्या तीन बस अशा चार बस जळून खाक झाल्या. यात तीन डिझेल तर एक इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे.
या घटनेची माहिती कळताच नवी मुंबई महापालिका परिवहन महाव्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी घणसोली डेपोला भेट देऊन पाहणी केली. आग नेमकी कशा मुळे लागली आहे. याबाबत चौकशी केली जाणार आहे. अभियांत्रिकी विभागाकडून बसची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती महाव्यवस्थापक कडूसकर यांनी दिली.
घणसोली डेपोत डिझेल बस मेंटेनन्ससाठी २८ मे पासून उभी होती. आज या बसला अचानक आग लागली. यामुळे एकूण चार बसगाड्यांचे नुकसान झाले.