औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; नीलेश राणे यांचे खळबळजनक ट्विट

औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; नीलेश राणे यांचे खळबळजनक ट्विट
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : या देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन समाजांबाबत चिंता वाटावी असे चित्र आहे, या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याला भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी जोरदार प्रत्युतर दिले. औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार, असे खळबळजनक ट्विट त्यांनी केले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

नीलेश राणे यांनी शरद पवार यांची तुलना थेट औरंगजेबशी केली. राणे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना आपल्या टीकेचे समर्थन केले.

मुस्लिम धर्माला वाढवण्यासाठी जे शक्य होते ते सगळे करायचे शरद पवारांचे धोरण आहे. ते जेवढी मुस्लिमांची बाजू घेतात, तेवढी हिंदू समाजाची कधी घेत नाहीत. म्हणून मला असे वाटले की, औरंगजेब त्यांच्या रूपाने परत जन्माला आला आहे, असे ते म्हणाले.

यावर राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी नीलेश राणे यांना चांगलेच सुनावले आहे. शरद पवार तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत. ते देशातील एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबाबत असे वक्तव्य लज्जास्पद आहे, असे त्या म्हणाल्या.

नीलेश राणेंच्या कानाखाली वाजवा, एक लाख रुपये मिळवा

दरम्यान, नागपूर जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष शिवराज ऊर्फ बाबा गुजर यांनी राणे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. 'नीलेश राणेंच्या कानाखाली वाजवा, एक लाख रुपये मिळवा' असे आवाहन त्यांनी केले आहे.

तर दोन पायावर घरी जाणार नाही…

शरद पवार यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर जोरदार टीका झाल्यानंतर नीलेश राणे यांनी गुरुवारी आणखी एक तितकेच वादग्रस्त ट्विट केले. या ट्विटमध्ये ते म्हणतात, "राणेंना धमकी देऊन काहीच फायदा नाही. आम्ही कधीही कोणाच्या धमकीला भीक घातली नाही. समोर आलात तर दोन पायावर घरी परत जाणार नाही लक्षात ठेवा. राहिला विषय शरद पवार यांचा. तर त्यांच्यात आणि औरंगजेबमध्ये साम्य आढळणं साहजिक आहे. औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशिव आणि अहमदनगरला अहिल्यानगर ही दिलेली नावे आम्हाला आणि आमच्या पक्षाला मान्य आहेत, असे ट्विट करा किंवा जाहीर स्टेटमेंट करा. आम्ही तुमचे अभिनंदन करू."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news