NESCO Case: गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्जप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ

चारही आरोपींना पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले
Jail
JailPudhari
Published on
Updated on

मुंबई: गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील ड्रग्जप्रकरणी चार आरोपींच्या पोलीस कोठडीत सोमवारी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यात आनंद लक्ष्मण पटेल, विनित सुनिल गेरेलानी, शुभ रामलखन अग्रवाल आणि आयुष विकी साहित्य यांचा समावेश आहे.

पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने या चौघांनाही पोलीस बंदोबस्तात बोरिवलीतील न्यायालयात हजर करण्यात आले होते. या चौघांच्या बँक खात्याची तपासणी करण्यात आली असून ड्रग्ज खरेदी-विक्रीचे काही व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.

Jail
Mumbai Water Cut: शहर, उपनगरांना पाणी कपातीची झळ; टँकरची मागणी वाढली

त्यात गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये एका लाईव्ह कॉर्न्स्टमध्ये मद्यासह ड्रग्जचे सेवन केल्यानंतर दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता तर एका तरुणीवर उपचार सुरु आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी पाचजणांना न्यायालयीन कोठडी तर इतर पाचजण पोलीस कोठडीत होते.

त्यापैकी आनंद लक्ष्मण पटेल, विनित सुनिल गेरेलानी, शुभ रामलखन अग्रवाल आणि आयुष विकी साहित्य यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने सोमवारी दुपारी त्यांना बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते.

Jail
War Impact: बांधकाम क्षेत्राला युद्धाची झळ; जानेवारी-मार्चच्या तिमाहीत नवीन बांधकामात 36 टक्क्यांची घट

यावेळी पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्यातून ड्रग्ज खरेदीसाठी काही ऑनलाईन व्यवहार झाल्याचे सांगून तपासासाठी आणखीन काही दिवसांची विनंती केली होती. आरोपी एका बड्या ड्रग्ज तस्कराच्या संपर्कात होते. त्याच्या पत्नीच्या खात्यात काही ऑनलाईन व्यवहार झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news