NEET-PG Exam : परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक? जयंत पाटील यांचा सरकारला सवाल

देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे : जयंत पाटील
NEET-PG Exam, Jayant Patil
नीट पीजी (NEET-PG) प्रवेश परीक्षाFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नीट पीजी (NEET-PG) प्रवेश परीक्षा  पुढे ढकलण्यात आली आहे. तर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २५ ते २७ जून दरम्यान होणारी संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभुमीवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे.( NEET-PG Exam)

देशभरात झालेल्या 'नीट' आणि 'नेट' परिक्षांमधील गैर- व्यवहार पुढे आले. 'नीट' पेपरफुटी आणि 'नेट' परीक्षेच्या गैरव्यवहारानंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या कार्यप्रणालीवर सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विविध स्तरामधुन संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. दरम्यान आज (दि.२३) होणारी नीट पीजी (NEET-PG) प्रवेश परीक्षा  पुढे ढकलण्यात आली आहे. तर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २५ ते २७ जून दरम्यान होणारी संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या एक्स पाेस्‍टमध्‍ये केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

NEET-PG Exam, Jayant Patil
NEET-PG Exam : आज होणारी नीट परीक्षा पुढे ढकलली

NEET-PG Exam : परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ?

जयंत पाटील यांनी आपल्‍या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतीकारी गोष्टी घडल्याही आहेत. पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली. आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. ‘देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे’ असे कायम बोलले जाते, मात्र याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे.

NEET-PG Exam, Jayant Patil
राज्यभरात नीट प्रवेश परीक्षा सुरळीत

अवघ्या १२ तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ? मुळात अशा प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी, मात्र केंद्र शासनाला सर्व काही स्वतःच्या हातात ठेवायचे असल्याने या अडचणी उद्भवत आहेत. या अनागोंदीमुळे उद्विग्न उद्या काही तरुण तरुणींनी टोकाचे निर्णय घेतले तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल."

NEET-PG Exam, Jayant Patil
एकच प्रवेश परीक्षा! ‘जेईई-नीट’ CUET मध्ये विलीन होणार, UGC चा प्रस्ताव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news