NEET PG 2025 | नीट-पीजी ३ ऑगस्टला; १३ ते १७ जूनदरम्यान भरता येणार पसंतिक्रम

NEET PG Preference Filling | सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र निवडण्यासाठी शहर निवडण्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे.
NEET PG Exam Date
NEET PG Exam(Pudhari File Photo)
Published on
Updated on

NEET PG Exam Date

मुंबई : दोनऐवजी एका सत्रात परीक्षा घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (नीट-पीजी) परीक्षेची तारीख नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सकडून (एनबीईएमएस) जाहीर करण्यात आली. त्यानुसार नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. यासाठी परीक्षा केंद्र पसंतीक्रम नोंदविण्यासाठी १३ ते १७ जूनपर्यंत मुदत देण्यात येणार आहे.

पर्सेंटाईलमुळे होणारा गोंधळ लक्षात घेत वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी नीट-पीजी परीक्षा देणाऱ्या दोन ऐवजी एका सत्रात घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एनबीईएमएसने नीट-पीजी परीक्षा एकाच सत्रामध्ये घेण्याचा निर्णय घेत ही परीक्षा ३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. परीक्षा एकाच सत्रामध्ये घेण्यासाठी एनबीईएमएसने परीक्षा केंद्र असलेल्या शहरांमध्ये वाढ केली आहे.

NEET PG Exam Date
NEET PG Exam : नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्टला घ्यावी; 'एनबीई'ची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी

तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र निवडण्यासाठी शहर निवडण्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना १७जून रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत शहरांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी निवडलेल्या शहरातील परीक्षा केंद्राची एनबीईएमएसद्वारे वाटप करण्यात येणार आहे. परीक्षेसाठीच्या शहरांची निवड ही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जामध्ये नाव, श्रेणी, राष्ट्रीयत्व, ईमेल, मोबाईल नंबर आणि परी-क्षेचे शहर वगळता अन्य माहिती व कागदपत्रे संपादित करण्यासाठी २० ते २२ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

NEET PG Exam Date
NEET PG 2025 | 'नीट-पीजी'बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, आता एकाच शिफ्टमध्ये परीक्षा

विद्यार्थ्यांना २१ जुलै रोजी परीक्षा शहराची माहिती कळविण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ जुलै रोजी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राची माहिती देण्यात येणार आहे. तसेच परीक्षेचा निकाल ३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news