

नवी दिल्ली : नीट-पीजी-२०२५ ही परीक्षा ३ ऑगस्ट रोजी घेण्याच्या परवानगीसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने दुहेरी शिफ्टऐवजी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एनबीईने १५ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे एनबीईने म्हटले आहे.
नीट पीजी परीक्षेचे आयोजन एनबीईकडून टीसीएसच्या तांत्रिक भागीदारीने केले जाते. टीसीएसने एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी ३ ऑगस्ट ही लवकरात लवकरची तारीख दिली आहे, असे एनबीईने अर्जात म्हटले. टीसीएसनुसार, ३० मे ते १५ जून दरम्यानचा कालावधीमध्ये एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेणे शक्य नव्हते. कारण सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदाच परीक्षा घेण्यासाठी पुरेसे परीक्षा केंद्र उपलब्ध नाहीत. यासाठी १ हजार पेक्षा परीक्षा केंद्र लागणार आहेत. त्यासाठी बराच वेळ लागेल, असे एनबीईने म्हटले आहे. दरम्यान, नीट पीजी २०२५ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एनबीईने सोमवारी घेतला आहे.