NCP internal dispute: राष्ट्रवादीत विलीनीकरणावर दोन मतप्रवाह; शिवसेनेच्या मंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याची आमदारांची तक्रार

सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अंतर्गत गटबाजी, मतदारसंघांना निधी आणि सत्तेतील वाट्याबाबत आमदारांनी व्यक्त केली नाराजी.
Sunetra Pawar
Sunetra Pawar Pudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत ताण व त्याचा पक्षाच्या वाढीवर विपरीत परिणाम होत असल्याची गंभीर चिंता आमदारांच्या बैठकीत मंगळवारी (दि. ३) व्यक्त करण्यात आली. शिवसेनेचे मंत्री आम्हाला निधी देत नाहीत, अशी तक्रारही या बैठकीत अनेक आमदारांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी झालेल्या बैठकीला पक्षाचे सुमारे ३३ आमदार उपस्थित होते. यामध्ये २८ विधानसभेचे सदस्य, तर ५ विधान परिषद सदस्यांचा समावेश होता.

Sunetra Pawar
Vande Bharat Sleeper: मुंबई-बेंगळुरू वंदे भारत स्लीपरला पहिल्याच दिवसापासून प्रतिसाद; १६ नोव्हेंबरपर्यंत तिकिटे वेटिंगवर

खा. तटकरे, पटेल उपस्थित या बैठकीला दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेलेले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही खासदार आवर्जून उपस्थित होते.

मनात आहे ते बोला : तटकरे

सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दुष्काळी कामाबाबत आमदारांनी पुढाकार घ्यावा, असे निवेदन केले. त्यानंतर ज्याच्या मनात जे आहे ते त्यांनी नमूद करावे. पक्षाच्या निकोप वाढीसाठी ते आवश्यक असल्याचे सांगत मंच खुला करण्यात आला.

सत्तेत असून फायदे नाहीत; आमदारांची खंत

बहुतांश आमदारांनी बैठकीत सध्या जे सुरू आहे ते पक्षाला ताकद देणारे नाही, उलट पक्षाची ताकद कमी करणारे असल्याची खंत व्यक्त केली. यावेळी बोलताना सत्तेत असूनही सत्तेचे फायदे मिळत नसल्याची गंभीर तक्रार बहुतांश आमदारांनी केल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.

Sunetra Pawar
Tiger Shroff Juhu Firing Case:टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात बारावा आरोपी अटकेत; २५ ते ३० बँक खात्यांचे जाळे संशयाच्या भोवऱ्यात

शासकीय योजनांचा लाभ नाही

शासकीय योजनांचा लाभ आमच्या मतदारसंघांना मिळत नाही त्याकडे लक्ष द्या, असे नेत्यांना विनवण्यात आले. शिवसेना शिंदे गटाकडील खात्यांमधून राष्ट्रवादी काँग्रेसला कोणताही निधी मिळत नसल्याची तक्रारही यावेळी आकडेवारीसह करण्यात आली. यासंदर्भात योग्य ती काळजी घ्यावी; अन्यथा सत्तेत असल्याचा लाभ काय, असा प्रश्नही यावेळी करण्यात आला.

कुरबुरीची चर्चा नको

त्यानंतर आमदारांनी बोलायला सुरुवात करताच पक्षातील कुरबुरीची उगाचच जाहीर चर्चा सुरू असते, त्यामुळे पक्षाचे मानसिक बळ खच्ची होत असल्याचे लक्षात येत आहे. पक्षातील गावपातळीवरचा कार्यकर्ता या चर्चांनी संपूर्णत: अस्वस्थ आहे. त्याच्या अस्वस्थतेकडे लक्ष दिले तरच पक्षाची पुढील वाट होऊ शकेल, असे लक्षात आणून दिले गेले.

पक्षाला गटबाजीने पोखरले

सध्या सुरू असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींमुळे पक्षाला फटका सोसावा लागतो आहे. पदवीधर निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची जागा जाणे हे अत्यंत दुर्दैवी आणि पक्षाला अंतर्गत गटबाजीने पोखरले असल्याचे लक्षण आहे. त्यातच सहकारी पक्षांनी सत्तेत असूनही मदत न केल्याचेही यावेळी लक्षात आणून देण्यात आले.

‘या’ कारणाने आमदार गैरहजर

४१ आमदारांपैकी काही आमदार निरोप उशिरा मिळाल्यामुळे ग्रामीण भागातून पोहोचू शकले नाहीत, तसेच काही आमदारांच्या मतदारसंघांमध्ये बँकांच्या निवडणुका असल्यामुळे त्यांना हजर राहणे शक्य झाले नाही, असेही सांगण्यात आले.

अंतर्गत वाद मिटायला हवेत

संपूर्ण पक्ष एक आहे. तो सुनेत्रा पवार व सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पुढे जाईल. मात्र, अंतर्गत वाद मिटायला हवेत, असे यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले. पार्थ पवार आणि सुनील तटकरे या दोघांनीही परस्परांशी जुळवून घेणे गरजेचे असल्याचे मत आमदारांनी व्यक्त केले.

वेगळी चूल मांडण्यासाठी दिल्ली भेट नव्हती

रात्री उशिरा ही बैठक संपली. या बैठकीला हजर नसलेल्या आमदारांनी गैरहजेरीची कारणे कळवली असल्याचेही सांगण्यात आले. अमित शहा यांना भेटण्यासाठी गेलेले सर्व नेते या बैठकीला हजर असल्यामुळे दिल्ली भेट ही पक्षविस्तार आणि पक्षाच्या वाढीसाठी होती, ती वेगळी चूल मांडण्यासाठी नव्हती, असा दावाही आता केला जात आहे.

राष्ट्रवादीला अर्थ खाते मिळणार का? अनिल पाटील यांचा सवाल

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खाते मिळणार आहे की नाही, हा प्रश्न सर्वांच्या मनात असल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात सत्ताधारी महायुतीने स्पष्टीकरण दिलेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित असलेले विधानसभा आमदार

१) अनिल पाटील २) प्रताप पाटील-चिखलीकर ३) संजय बनसोडे ४) धनंजय मुंडे ५) नितीन पवार ६) बाबासाहेब पाटील ७) दत्ता भरणे ८) सरोज अहिरे ९) शेखर निकम १०) इंद्रनील नाईक, ११) सना मलिक १२) छगन भुजबळ १३) दिलीप वळसे-पाटील १४) विजयसिंह पंडित १५) आदिती तटकरे १६) अण्णा बनसोडे १७ ) हसन मुश्रीफ १८ ) माणिकराव कोकाटे १९ ) मनोज कायंदे २० ) काशीनाथ दाते २१) मकरंद पाटील २२) सुलभा खोडके २३) शंकर मांडेकर २४) दौलत दरोडा २५) माऊली कटके

विधान परिषद सदस्य

१) संजय खोडके २) इद्रीस नायकवडी ३) झिशान सिद्दिकी ४) पंकज भुजबळ ५) राजेंद्र जैन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी परस्परांमध्ये विलीन व्हावे, याबद्दलची चर्चा सतत सुरू असते. त्या चर्चेचाही आमदारांच्या बैठकीत उल्लेख करण्यात आला. एका गटाने विलीनीकरण झाले तर पक्षाची ताकद वाढेल, असे नमूद केले. तर, बहुतांश आमदारांच्या गटाने आता एकत्र येणे शक्य नाही.

उलट भूमिका स्पष्ट करत वेगळी वाटचाल सुरू करावी, असा आग्रह धरला. मात्र, ही वाटचाल जोमाने असावी. त्यात प्रत्येकाला विश्वासात घेतले जावे. मनमानी होऊ नये, तसेच गावपातळीवरच्या कार्यकर्त्याला विश्वास दिला जावा, असेही नमूद करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.