Nawab Malik High Court relief: नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

मनी लाँडरिंग प्रकरणात विशेष न्यायालयाच्या कार्यवाहीला अंतरिम स्थगिती
Nawab Malik High Court relief
Nawab Malik High Court reliefPudhari
Published on
Updated on

मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणात महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच अडचणीत सापडलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

Nawab Malik High Court relief
EX DGP Sanjay Pandey | फडणवीसांना गुन्ह्यात गोवण्याचे प्रकरण; माजी डीजीपी पांडे सूत्रधार

मलिक व इतरांविरुद्ध सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ‌‘ईडी‌’ने दाखल केलेल्या मनी लाँडरिंगच्या खटल्यांतर्गत विशेष न्यायालयाच्या कार्यवाहीला न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या एकलपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विशेष एमपीएमएलए न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये मलिक व इतर तिघांविरुद्ध आरोप निश्चित केले होते.

Nawab Malik High Court relief
Bharat Jadhav | दिल्लीत मराठी संस्कृतीची मेजवानी मनाला सुखद धक्का देणारी : अभिनेते भरत जाधव

त्यामुळे मनी लाँडरिंगच्या खटल्याचा मार्ग मोकळा झाल्याने मलिक यांची चिंता वाढली होती. या पार्श्वभूमीवर मलिक यांनी विशेष न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Nawab Malik High Court relief
BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीत ‘हप्ता वसुली 2.0’चा मुद्दा पुन्हा पेटला; कोणते आरोप होत आहेत?

विशेष न्यायालयाच्या त्या आदेशाला अंतरिम स्थगिती देत न्यायमूर्ती चांडक यांच्या एकलपीठाने, कागदपत्रांची यादी सादर करण्यासाठी पुढील सुनावणी 23 जानेवारीला निश्चित केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news