Municipal Employees Retirement Age: नवी मुंबई पालिकेत 58 व्या वर्षीच निवृत्ती; सत्ताधारी भाजपला मोठा धक्का

नवी मुंबई महापालिकेच्या 20 मार्च रोजी झालेल्या महासभेत आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरुन 60 वर्षे करण्याचा ठराव मंजूर केला होता. याबाबात पालिका सचिवांनी तसा अध्यादेशही काढला होता.
Navi Mumbai Municipal Coropration
Navi Mumbai Municipal CoroprationPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई: महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्याचा नवी मुंबई महापालिकेच्या महासभेचा निर्णय अखेर नगरविकास विभागाने फेटाळला आहे. हा महापालिकेतील सत्ताधारी भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या 20 मार्च रोजी झालेल्या महासभेत आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरुन 60 वर्षे करण्याचा ठराव मंजूर केला होता. याबाबात पालिका सचिवांनी तसा अध्यादेशही काढला होता.

Navi Mumbai Municipal Coropration
River Rejuvenation: पंचगंगा, चंद्रभागा, मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण; 54 प्रदूषित पट्ट्यांबाबत पुनरुज्जीवन प्रकल्प राबविणार

या निर्णयाचा सताधाऱ्यांनी मोठा गाजावाजाही केला. मात्र हा ठराव अशासकीय असल्याने शासनाची मंजुरी आवश्यक होती. यामुळे 27 मार्च रोजी महापालिका आयुक्तांनी तो राज्य सरकारच्या मान्यतेसाठी नगरविकास विभागाकडे पाठवला होता. 31 मार्च रोजी नगरविकास विभागाने हा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांचे निवृत्तीचे वय 58 वर्षेच असणार आहे.

भाजप न्यायालयात जाणार

नगरविकास विभागाने हा प्रस्ताव फेटाळल्याने पुन्हा एकदा नवी मुंबईतील भाजप व शिंदे सेनेत चांगलीच जुंपली आहे. याबाबत सभागृह नेते सागर नाईक यांनी न्यायलयात जाण्याचा इशारा दिला आहे. आम्ही अनुभव आणि काम करणाऱ्या कामगारांना न्याय देण्यासाठी हा निर्णय होता. मात्र नगरविकास विभागाने जाणीवपूर्वक तो फटाळल्याचे सभागृह नेते सागर नाईक यांनी सांगितले.

Navi Mumbai Municipal Coropration
SC Reservation Sub Categorization: अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर समिती; मंत्रिमंडळाचा निर्णय

भाजप- सेनेत संघर्ष टोकाला

नवी मुंबई महापालिकेत भाजपाने सत्ता मिळवल्यानंतर अनेक निर्णय घेतले. याला शिवसेनेने विरोध केला असून नगरविकासकडून ठराव रद्द केले जातील असा इशारा दिला होता. यातील पहिला निर्णय नगरविकास विभागाने फिरवल्याने हा संघर्ष आता टोकाला जाणार आहे.

आता कुणाची भूमिका नवी मुंबईसाठी विरोधाची आहे जनतेला समजले. अनुभवी कर्मचाऱ्यांना दोन वर्षे वाढवून मिळाल्याने पुढे जाऊन चांगले काम करतील. अशी आमची भावना होती. मात्र नगरविकास विभागाने तो फेळला आहे.

- सागर नाईक, सभागृह नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news