Navi Mumbai Budget: नवी मुंबई महापालिकेचा 6,704 कोटींचा अर्थसंकल्प सादर; करवाढ नाही, विकासकामांसाठी कर्जरोखे मार्ग

सिग्नल फ्री रस्ते, पार्किंग धोरण व पायाभूत सुविधांवर भर; 100 कोटी कर्ज घेण्याची महापालिकेची तयारी
Navi Mumbai Budget
Navi Mumbai BudgetPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 6,704.82 कोटींवर

विकास कामांसाठी 100 कोटींचे कर्ज घेण्याची दाखवली तयारी

नवी मुंबई : सिग्नल फ्री रस्ते, प्रभावी पार्किंग धोरण, होल्डिंग पाँड पुनरुज्जीवन व प्रभाग विकासाची हमी देत स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी सोमवारी महापौर सुजाता पाटील यांना 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 6,704.82 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला.

महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त सादर करतात. मात्र, यावेळी पहिल्यांदाच स्थायी समिती सभापतीने अर्थसंकल्प सादर केला आहे.

Navi Mumbai Budget
Gadchiroli Naxal Surrender: हिंसेचा मार्ग सोडून विकासाकडे; 794 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून सुरू केले नवे आयुष्य

या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आल्याचे स्थायी समिती सभापती पाटील यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध कर सुधारणा आणि महसूल वाढीचे उपाय यामध्ये सुचविण्यात आले आहेत. तसेच स्मार्ट सिटी उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि वाहतूक व्यवस्थेच्या उन्नतीसाठीही विशेष निधी राखीव ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.

Navi Mumbai Budget
Tushar Gandhi Mumbai University: तुषार गांधींना मुंबई विद्यापीठात प्रवेश नाकारला; प्रशासनावर टीकेची झोड

वनमंत्री गणेश नाईक यांनी पुढील वीस वर्षे कोणतीही करवाढ केली जाणार जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. त्याची अंमलबजावणी या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे नवी मुंबईच्या विकासासाठी कर्जरोख्यांद्वारे 400 कोटी रुपये जमा करण्याचे व 100 कोटींचे कर्ज घेण्याची तयारीही महापालिकेने दाखवली आहे. अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, वाहतूक कोंडी आणि कर वसुलीवर भर देण्यात आला आहे.

दिव्यांगणा अनेक विशेष सुविधा, रुग्णालयांत अत्याधुनिक सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि इतर सुविधा, यासह मुबलक पाणी, होणारी वाहतूक कोंडी आणि प्रत्येक प्रभागांमध्ये विकासाचा व्हिजन मांडण्यात आले आहे.

Navi Mumbai Budget
Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात 200 किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प सुरू

आकारमान वाढले

आरंभीची शिल्लक 1,839.58 कोटी रुपये व जमा 3,991.24 कोटी रुपये अशी मिळून एकत्रित जमा 5,830.82 कोटी रुपये आणि 4,564.98 कोटी रुपये खर्चाचे सन 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक आणि 1,265.83 कोटी रुपयांचा आरंभीच्या शिल्लकेसह 6704.43 कोटी रुपये जमा व 6689.43 कोटी रुपये खर्चाचे आणि 15.00 कोटी शिलकेचे नवी मुंबई महापालिकेचे सन 2026-27 चे मूळ अर्थसंकल्प महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news