Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात 200 किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प सुरू

सहा इमारतींवर सोलर पॅनल्स, 85 सौर स्ट्रीट लाईट्स; हरित ऊर्जा वापराकडे विद्यापीठाची मोठी पावले
सौरऊर्जा प्रकल्प
सौरऊर्जा प्रकल्पFile Photo
Published on
Updated on

मुंबई : कलिना संकुलात 200 किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून संकुलातील 6 इमारतींवर सुमारे 187 किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक 20 वॅट क्षमतेचे 85 सौर स्ट्रीट लाईट्स बसविण्यात आले आहेत. विद्यापीठाने शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत हरित ऊर्जा वापराच्या दिशेने आपली वाटचाल अधिक वेगवान केली आहे.

सौरऊर्जा प्रकल्प
Maharashtra Heatstroke: राज्यात उष्णतेचा तडाखा; उष्माघाताचे 5 रुग्ण नोंद, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कलिना संकुलातील सी. डी. देशमुख भवन, फिरोजशहा मेहता भवन, मौलाना अब्दुल कलाम आझाद भवन, बायो फिजीक्स विभाग इमारत, जुने व्याख्यान संकुल, लाईफ सायन्स विभाग इमारत यांचा समावेश आहे. तसेच प्रत्येक 20 वॅट क्षमतेचे 85 सौर स्ट्रीट लाईट्स बसविण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय भवन येथे 20 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते कार्यान्वित केले जाणार आहे.

सदरच्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी सीएसआरच्या निधीअतर्गत युनाइटेड वे ऑफ इंडिया यांच्या सहयोगाने आणि ऑप्टिवर लिमिटेड यांच्या आर्थिक मदतीने मुंबई विद्यापीठात सौर ऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

सौरऊर्जा प्रकल्प
Caste Certificate Maharashtra: बौद्ध समाजाच्या जात प्रमाणपत्रातील ‘नमुना क्रमांक 7’ रद्द करा; भारतीय बौद्ध महासभेची मागणी

नुकतेच या सौर ऊर्जा प्रणालीचा उदघाटन सोहळा पार पडला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, अधिसभा सदस्य सुशील जाजू,विद्यापीठ अभियंता छाया नलवडे, कनिष्ठ अभियंता मयूर कुंटे यांच्यासह ऑप्टिव्हर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक टिश घोष, मुख्य वित्तीय अधिकारी विपुल चटवाणी आणि युनाइटेड वे ऑफ इंडियाचे अध्यक्ष, संचालक मंडळ सदस्य रमन माधोक, मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज आयकारा, उपाध्यक्ष अजय गोवले, वरिष्ठ व्यवस्थापक मुकेश देव आणि सहाय्यक व्यवस्थापक प्रिया काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ठाणे उप परिसर, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अप्लायड सायन्सेस कल्याण आणि कुलगुरू निवास स्थान येथे 120 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला यशस्वीरित्या सुरुवात केल्यानंतर आता कलिना संकुलात अक्षय ऊर्जेच्या वापराच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

सौरऊर्जा प्रकल्प
APMC Mango: एपीएमसीत हापूस आंब्याची मोठी आवक; दरात चढ-उताराची शक्यता

अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे या त्रिसूत्री उद्दिष्टांनुसार विद्यापीठाने विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

कलिना संकुलातील या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे कॅम्पसचा मोठा भाग अक्षय ऊर्जा स्त्रोतांवर चालणार असून वार्षिक वीज खर्चात लक्षणीय बचत होणार आहे. याशिवाय पर्यावरणाच्या दृष्टिने दरवर्षी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा हेतूही साध्य केला जाणार आहे. या इमारतीमध्ये सौरऊर्जेच्या वापरामुळे महिन्याला 4 लाखांहून अधिक वीज खर्च कमी होणार आहे.

सौरऊर्जा प्रकल्प
India Digital Census: देशात 1 एप्रिलपासून डिजिटल जनगणना; लिव्ह-इन जोडप्यांनाही ‘विवाहित’ दर्जा

200 किलोवॅट क्षमतेच्या या सौर प्लांटमध्ये नेट मीटरिंग प्रणाली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून पूर्ण इमारतींना सौर उर्जा मिळणार असून या प्रणालीतील नेट मीटर सिस्टमसह सौर पॅनेल आणि इन्व्हर्टर समाविष्ट असल्याने अतिरिक्त उर्जाही विकसित करून त्याचे नियोजन केले जाणार आहे. साधारणपणे 200 किलोवॅट सोलर पॅनल प्रणाली पॅनलचा उपयोग करून प्रतिवर्षी 2 लाख 60 हजार युनिट वीज निर्मिती निर्माण केली जाऊ शकणार आहे.

विजेच्या वाढत्या मागणी आणि किमतीमुळे सरंक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि जीवाश्म इंधनावरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच कार्बन न्युट्रल ग्रीन कॅम्पसच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठाने हे महत्वाचे पाऊल टाकले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news