Navi Mumbai Municipal Contract: 10 ते 18 वर्षे सेवा दिली, तरी कायम नाही? 479 कंत्राटी कर्मचाऱ्यांवरून हायकोर्टाचा सरकारला जाब

नवी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणावर निर्णय घेण्याचे आदेश; 19 जानेवारीला पुढील सुनावणी
Navi Mumbai Municipal Election
Navi Mumbai Municipal ElectionPudhari
Published on
Updated on

मुंबई : नवी मुंबई महापालिकेमध्ये 10 ते 18 वर्षांपासून सेवेत असलेल्या 479 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात काय निर्णय घेतला, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत निर्णय घ्या आणि त्याचा आराखडा सादर करा, असे आदेश गेल्या महिन्यात न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते.

Navi Mumbai Municipal Election
Mangalam Drugs Share Price: मायक्रोकॅप शेअरची झेप! मंगलम ड्रग्जने 12 दिवसांत गुंतवणूकदारांना दिला 85% नफा

मात्र सरकारी वकिलांकडे याबाबत कोणतीही माहिती नसल्याने न्यायमूर्ती आर. आय. छागला आणि न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठना यांच्या खंडपीठाने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला याबाबत निर्णय घेऊन कार्यवाहीचा आराखडा सादर करण्याचे आदेश देत याचिकेची सुनावणी 19 जानेवारीपर्यंत तहकूब ठेवली.

Navi Mumbai Municipal Election
Mumbai Election Drugs Seizure: मुंबईत निवडणूक काळात 45 कोटींचे 55 ग्रॅम अमली पदार्थ जप्त; 29 जणांविरोधात गुन्हे

नवी मुंबई महापालिकेने 668 मंजूर पदांसाठी जाहिरात दिली होती. तथापि, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत निर्णय घेतला नाही. त्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवेतील नियमितीकरणासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यापैकी काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ॲड. सुमीत काटे आणि ॲड. आशिष पवार यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती आर. आय. छागला आणि न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Navi Mumbai Municipal Election
Mumbai Redevelopment Voting: मुंबईत पुनर्विकास रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार; 388 व जुहूच्या 200 इमारतींच्या रहिवाशांचा निषेध

तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती

नवी मुंबई महापालिकेत दीर्घकाळ सेवा दिलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण शारीरिकदृष्ट्या दिव्यांग तसेच 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली होती. ते महापालिकेच्या मुख्य कामांमध्ये कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news