Navi Mumbai Water Shortage: नवी मुंबईत लवकरच पुन्हा १० टक्के पाणीकपात? मोरबे धरणात ७० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा

घणसोलीच्या सिम्प्लेक्स कॉलनीत केवळ अर्धा तास पाणी
Morbe Dam
Morbe Dam Pudhari
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई: नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये सध्या ७० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा शिल्लक आहे. धरणातील घटत्या साठ्यामुळे सुनियोजित नवी मुंबईसह खारघर आणि कळंबोली परिसरावर पाणीटंचाईचें संकट ओढवले आहे.

घणसोलीच्या सिम्प्लेक्स कॉलनीतील ३२०० घरांना सध्या फक्त अर्धा तास पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे हे पुढील दोन दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याबाबत कठोर नियोजनाची रूपरेषा जाहीर करणार आहेत.

Morbe Dam
Mumbai Slum: १४ फुटांवरील झोपड्यांना तूर्त अभय? पालिका आयुक्तांनी रोखली कारवाई ; शहरातील लाखो झोपडीधारकांना दिलासा

संभाव्य पाणीबाणी टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिका आता कोणती ठोस पावले उचलणार, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. यामुळे नवी मुंबईत पुन्हा दहा टक्के पाणीकपात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

घणसोलीच्या सिम्प्लेक्स कॉलनीतील महिला रहिवाशांनी पाण्यासाठी टाहो फोडला आहे. टॉवरमध्ये दिवसभर पाणी पुरवठा होताे. मग सिम्प्लेक्स कॉलनीत तासभरही का पाणीपुरवठा होऊ शकत नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

नवी मुंबई महापालिका किंवा सिडकोने व्यवस्थित नियोजन करून लोकांना कमीत कमी ५०० लिटर ते ७०० लिटर पाणी द्यावे.

Morbe Dam
Navratri 2026: यंदा नवरात्री नव्हे ‘दशरात्री’! यावर्षी शारदीय नवरात्र ११ ॲाक्टोबरला, तर २० रोजी दसरा

जर बाकीच्या विभागाला २४ तास पाणी मिळत असेल आणि आम्हाला पाच-दहा मिनिटेही व्यवस्थित पाणी मिळत नसेल, तर मग त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळे म्हणजे आंदोलन करावे लागेल. याशिवाय आमच्याकडे कुठलाच पर्याय असणार नाही, असे सिम्प्लेक्स कॉलनीतील महिला रहिवाशांकडून सांगण्यात आले.

​जिथे मोठमोठे टॉवर आहेत,त्यांना २४-२४ तास पाणी देता. मग आम्हीच काय महापालिकेचे घोडे मारले आहे, असा प्रश्न सिम्प्लेक्स कॉलनीतील रहिवाशांचा आहे. हा त्रास सर्वांनाच व्हायला हवा.आम्ही असे म्हणत नाही की आम्हाला २४ तास पाणी द्या.

पण सकाळी किमान एक ते दीड तास तसेच संध्याकाळी २०-२५ मिनिटे पाणी पुरवठा केला पाहिजे. शहरातील टॉवरमध्ये पाणी वाया जाते. त्याला चाप लावा. असे केल्यास सगळ्यांना सुरळीत पाणी मिळेल. नाही तर सामान्य माणसांनी असंच जगायचं आणि बाकीच्यांनी फायदाउठवायचा, हे कोणत्या नियमात बसते, असा सवालही नागरिक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news