Navi Mumbai Illegal Building: बनावट स्टे ऑर्डरनंतर नवी मुंबई पालिका ॲक्शन मोडमध्ये

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने तातडीने कारवाई करून संबंधित बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.
BMC
BMCPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई: न्यायालयाची खोटी (बनावट) स्टे ऑर्डर दाखवून वाचवण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर अखेर नवी मुंबई महापालिकेने हातोडा मारला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने तातडीने कारवाई करून संबंधित बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.

नेरूळमध्ये अनधिकृत इमारतीला कथित बोगस स्टे ऑर्डर दाखवून कारवाई थांबवण्यात आली होती. या प्रकरणावरून आता शिंदे गटाचे शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी कारवाईची मागणी केली आहे.

BMC
Textile Market: कापड कंपन्या आयपीओद्वारे उभारणार निधी

तर नवी मुंबई महापालिकेने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली. दरम्यान, नवी मुंबई महापालिका आता ॲक्शन मोडमध्ये आली असून शहरातील अनधिकृत बांधकामां विरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणातून अनधिकृत इमारती उभारणारे भूमाफिया आणि काही स्थानिक पुढाऱ्यांचा साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून नियमबाह्य इमारतींवर महानगरपालिकेने कारवाईचा इशारा दिला आहे.

नवी मुंबईमध्‍ये अशी शेकडो प्रकरणे आहेत की, ज्याच्या खोट्या सीसी आहेत आणि खोट्या स्टे ऑर्डर आहेत आणि त्याच्यावरती काही लोकांची पोट भरण्याचे काम चालू आहे. मी आयुक्तांना याबाबत मागणी करणार असल्‍याचे विजय चौगुले यांनी सांगितले.

BMC
Indian Mango Promotion: आईसलँडच्या बाजारपेठेत कोकण ‘हापूस’ची धूम

तर दिघ्यापासून बेलापूरपर्यंतच्या सर्व इमारतींना दाखवण्यात आलेले स्टे ऑर्डर्स आणि बांधकाम परवानगीची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी केली आहे. या तपासामध्ये मोठ्या प्रमाणावरती बोगस स्टे ऑर्डर आणि बनावट बांधकाम परवानग्या उघड होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे.

सर्व्हे व्हायलाच पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे नव्या मुंबईमध्ये अशी शेकडो प्रकरणं आहेत की ज्याच्या खोट्या सीसी आहेत आणि खोट्या स्टे ऑर्डर आहेत. आणि त्याच्यावरती काही लोकांची पोटं भरण्याचं काम चालू आहे. मी आयुक्तांना याबाबत मागणी करणार आहे की याची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी.

- ​विजय चौगुले उपनेते, शिवसेना, शिंदे गट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news